1 / 10'ठिपक्यांची रांगोळी' (thipkyanchi rangoli) या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे कानिटकर कुटुंबाची कथा सांगणारी ही मालिका आज प्रत्येक घरात पाहिली जाते.2 / 10 या मालिकेत शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी तगडी स्टारकास्ट आहे. 3 / 10मालिकेतील तगड्या स्टारकास्टसोबतच या मालिकेत आणखी एक ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री असल्याचं पाहायला मिळतं. ती म्हणजे अभिनेत्री शुभा खोटे.4 / 10या मालिकेत शुभा खोटे यांनी दुर्गा आत्या ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या मालिकेत दुर्गा आत्याने तिच्या खमकेपणामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.5 / 10विशेष म्हणजे दुर्गा आत्याची म्हणजेच अभिनेत्री शुभा खोटे यांची लेकदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.6 / 10शुभा खोटे यांच्या लेकीचं नाव भावना बलसावर आहे. भावना हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.7 / 10भावनाने हिंदीसह मराठी कलाविश्वातही काम केलं आहे. यात 'सुखी संसाराची बारा सूत्रे', 'आमच्यासारखे आम्हीच' चित्रपटातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. 8 / 10भावनाने मराठीपेक्षा हिंदी मालिका, सिनेमांमध्ये जास्त काम केलं.9 / 10 तहकिकात, करमचंद, इधर उधर, दम दमा दम, हेरा फेरी, लाखों में एक, गुटूर गुं, सतरंगी ससुराल, हम सब बाराती, बेलन वाली बहु, गुडीया हमारी सभी पे भारी, स्पाय बहु अशा कितीतरी मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.10 / 10भावना हिने २०११ साली अभिनेता करण शाहसोबत लग्न केलं. जवळपास १२ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर त्यांनी हा निर्णय घेतला.