खरं तर मुलं आवडतात, पण मुलीसोबत लग्नालाही तयार; बिग बॉसच्या घरात मूस जट्टानाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 15:33 IST
1 / 9बिग बॉस ओटीटी सध्या जाम चर्चेत आहे. म्हणायला शो सुरू होऊन उणेपुरे 5 दिवस झालेत. पण नेहमीप्रमाणे शोचे स्पर्धक धुमाकूळ घालत आहेत.2 / 9यापैकीच एक स्पर्धक म्हणजे मूस जट्टाना उर्फ मुस्कान जट्टाना. होय, मूस सध्या तिच्या एका विधानामुळे चर्चेत आलीये.3 / 9बिग बॉसच्या घरात मूस असे काही बोलून गेली की, सगळेच हैराण झालेत.4 / 9शोमध्ये तिने तिच्या सेक्शुअॅलिटीचा खुलासा केला. को-कंटेस्टंट प्रतिक सेहजपालशी बोलताना आपण बायसेक्शुअल असल्याचे तिने सांगितले.5 / 9 गुरूवारी मूस आणि प्रतिक एकमेकांसोबत बोलत होते. त्यावेळी तुला मुलं आवडतात की मुली? असा प्रश्न प्रतिकने तिला केला.6 / 9यावर, ‘मी मुलांकडे अधिक आकर्षित होते. मला मुलं आवडतात. पण लग्नाचे म्हणाल तर मुलीशीही लग्नासाठी मी तयार आहे,’असे असे मूस म्हणाली.7 / 9 मूसचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला आहे. मूस 20 वर्षांची आहे. मूसचे आई-वडील हे पंजाबच्या मोहाली येथे राहणारे आहे.8 / 9मूसला टिक टॉक व इन्स्टाग्रामने ओळख दिली. सोशल मीडियावर ती तिच्या बेधकड स्वभावासाठीच ओळखली जाते.9 / 9ती महिल्यांच्या तसेच समलैंगिकतेच्या मुद्द्यावर आपली मतं बेधडकपणे मांडताना दिसते. न्यूड लाइव्ह सेशन केल्यामुळं ती वादाच्या भोव-यात सापडली होती.