"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 15:50 IST
1 / 10बिग बॉस ओटीटी २ फेम पलक पुरसवानीने मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्टचा स्कॅम उघड केला आहे. पलकने तिच्या इन्स्टा स्टोरीवर आता वेळ आलीय... असं म्हणत मोठी पोस्ट शेअर केली आहे.2 / 10पोस्टमध्ये पलक पुरसवानीने दोन अकाउंट शेअर केले आहेत. त्यापैकी एक अकाउंट टिया नावाचं आहे आणि दुसरं प्रज्ञा नावाचा आहे. तिने दोघीही स्कॅमर असल्याचं म्हटलं आहे.3 / 10पलकने लिहिलं की, इंडस्ट्रीमध्ये एक मुलगी आहे जी स्वतःला स्टायलिस्ट म्हणवून लोकांना फसवत आहे. तिने आतापर्यंत पलकच्या ओळखीच्या अनेक कलाकारांना फसवलं आहे.4 / 10यामध्ये टीव्ही अभिनेत्री सिमरन बुधरुपचाही समावेश आहे. ही मुलगी स्टायलिंग असाइनमेंटबद्दल लोकांशी बोलते आणि त्यांच्याकडून अॅडव्हान्स घेते आणि नंतर कपडे येत नाहीत किंवा ती गायब होते.5 / 10सिमरन व्यतिरिक्त पलक पुरसवानीला ओळखणाऱ्या इतर अनेक कलाकारांसोबत ही धक्कादायक घटना घडली आहे. 6 / 10अशा परिस्थितीत अभिनेत्रीने सर्वांना सावधगिरी बाळगण्याचा आणि काहीही बुक करण्यापूर्वी चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे.7 / 10पलकची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली आहे. युजर्सनी याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. मेकअप आर्टिस्ट आणि स्टायलिस्ट ट्रोल होत आहेत.8 / 10पलकने 'बडे भैया की दुल्हनिया', 'मेरी हनीकारक बीवी', 'ये रिश्ते हैं प्यार के', 'दुर्गा: माता की छाया' आणि 'दबंगी' यासारख्या शोमध्ये काम केलं आहे.9 / 10अभिनेत्री सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे असंख्य चाहते आहेत. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 10 / 10