Join us  

Baby Roy Coming Soon! सई लोकुरने केलं हटके मॅटर्निटी फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 6:09 PM

1 / 8
‘बिग बॉस मराठी’तून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. गेल्या काही काळापासून सईचा कलाविश्वातील वावर कमी झाला आहे.
2 / 8
सईने दोन वर्षांपूर्वी तीर्थदीप रॉयबरोबर लग्न केलं. तेव्हापासून ती फारशी कोणत्या प्रोजेक्टमध्ये झळकली नाही.
3 / 8
सई सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून नुकतीच तिने चाहत्यांनी एक गोड बातमी दिली आहे. सई लवकरच आई होणार आहे.
4 / 8
काही दिवसांपूर्वी सईने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत ती आई होणार असल्याचं सांगितलं.
5 / 8
चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केल्यानंतर आता सईने मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
6 / 8
सईने तिच्या पतीसोबत हे मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
7 / 8
सईने समुद्र किनाऱ्यावर हे फोटोशूट केलं आहे.
8 / 8
सईने या फोटोशूटसाठी अनेक नवनवीन आयडिया वापरल्या आहेत.
टॅग्स :सई लोकूरसेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉस मराठी