"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:54 IST
1 / 8Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. टीव्हीचा सुपरस्टार गौरव खन्नाने 'बिग बॉस १९'ची ट्रॉफी त्याच्या नावावर केली. तर प्रणित मोरेला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. 2 / 8प्रणितची बिग बॉसच्या घरात काही लोकांसोबत चांगली मैत्री झाली आणि त्यापैकीच एक म्हणजे मालती चहर. 3 / 8प्रणित आणि मालती चहरची फ्रेंडशिप चाहत्यांनाही आवडली. प्रणितला अचानक एक्झिट घ्यावी लागली होती तेव्हा मालतीला वाईट वाटलं होतं. तर मालतीने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतल्यानंतर प्रणित रडला होता. 4 / 8मालती आणि प्रणित बिग बॉसच्या घरात एकमेकांची काळजीही घेताना दिसले. त्यामुळेच त्यांच्यात फक्त मैत्री आहे की आणखी काही? याबाबत चर्चा रंगल्या होत्या. 5 / 8प्रणितच्या आईवडिलांनी मालती चहर आणि त्याच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. मालती कशी वाटली? असं विचारताच प्रणित मोरेची आई हसली. 6 / 8त्या म्हणाल्या, 'ते तुम्ही त्यालाच जाऊन विचारा'. तर प्रणित मोरेच्या वडिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा होते आहे. 7 / 8प्रणितचे वडील मालतीबद्दल म्हणाले, 'ती खूप चांगली मुलगी आहे. कोणीही वाईट नसतं. नतालियाही चांगली होती. फरहाना आणि तान्या या दोघीही सगळ्यात चांगल्या आहेत'. 8 / 8त्यानंतर प्रणितच्या वडिलांना मालती आणि त्याच्या नात्याबद्दल विचारलं गेलं. तेव्हा ते म्हणाले, 'त्या दोघांमध्ये नक्की काय आहे ते आता बाहेर आल्यावर समजेल'.