Bigg Boss 19 : अशनूर कौर आणि अभिषेक बजाजमध्ये 'किती' आहे वयाचे अंतर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:20 IST
1 / 10वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस १९'मध्ये सध्या अभिनेता अभिषेक बजाज आणि अभिनेत्री अशनूर कौर यांच्यातील जवळीक लक्ष वेधून घेत आहेत. अशातच दोघांमध्ये असलेलं वयाच अंतर चर्चेत आलं आहे. 2 / 10अशनुर कौर आज एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं होतं. वयाच्या ५ व्या वर्षापासूनच तिने अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. 3 / 10'झांसी की रानी', 'ये रिश्ता क्या कहलाता है', 'पटियाला बेब्स' आणि 'सुमन इंदोरी' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केले आहे. 4 / 10मालिकांनंतर सध्या ती बिग बॉसचं घर गाजवत आहे. यावेळी ती बिग बॉस सीझन १९ मधील सर्वात तरुण स्पर्धक आहे. 5 / 10अशातच दोघांमध्ये असलेलं वयाच अंतर चर्चेत आलं आहे. अभिषेक बजाज हा लोकप्रिय अभिनेता असून तो 'स्टुडंट ऑफ द इयर २'मध्ये झळकला आहे. 6 / 10 अशनूर कौर ही फक्त २१ वर्षांची असून अविवाहित आहे. तर दुसरीकडे अभिषेक हा घटस्फोटीत आहे.7 / 10अभिषेक बजाजचं लग्न आकांक्षा जिंदालशी झालं होतं. ते बालपणीचे मित्र होते. त्यानंतर सात वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या दीड वर्षानंतर या जोडप्यानं घटस्फोट घेतला. 8 / 10आता, आकांक्षानं त्यांच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं आहे, ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. आकांक्षाने अभिषेकवर फसवणूक आणि विश्वासघाताचा गंभीर आरोप केला.9 / 10अभिषेक बजाज आणि अशनूर कौर यांच्यात दोघांच्या वयात तब्बल १२ वर्षांचे अंतर आहे. अशनूर अभिषेकपेक्षा १२ वर्षांनी लहान आहे.10 / 10बिग बॉसच्या घरात या दोघांमधील जवळीक पाहून आता हे नातं कुठवर जातंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.