Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेशी लग्न करण्याआधी 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता विकी जैन, फोटोही झालेले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 17:50 IST

1 / 10
मराठमोळी अभिनेत्री अंकिता लोखंडेने पती विकी जैनसह 'बिग बॉस १७'मध्ये मोठ्या दिमाखात एन्ट्री घेतली होती. पण, पहिल्या दिवासापासूनच अंकिता आणि विकीमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळत होतं.
2 / 10
छोट्या छोट्या कारणावरुन अंकिता आणि विकीमध्ये सतत वाद होत आहेत. यामुळे त्या दोघांना ट्रोलही करण्यात आलं होतं. 'बिग बॉस'च्या घरात आल्यानंतर अंकिता आणि विकीमध्ये दुरावा आलाय की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
3 / 10
अनेकदा अंकिता आणि विकीमधील वाद टोकाला गेल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यामुळे अभिनेत्रीने विकीला घटस्फोट घेण्याची तंबीही दिली होती.
4 / 10
अंकिता आणि विकीने २०२१मध्ये लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. सोशल मीडियावरही ते अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसायचे.
5 / 10
२०१७ मध्ये अंकिताबरोबरच्या रिलेशनशिपमुळे विकी जैन चर्चेत आला होता. पण, अंकिताच्या प्रेमात पडण्याआधी एका बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर विकीचं अफेअर होतं.
6 / 10
बॉलिवूड अभिनेत्री टिया बाजपायीच्या प्रेमात विकी जैन वेडा झाला होता. २०१२ मध्ये विकी आणि टियाच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या.
7 / 10
अंकिताशी लग्न करण्याआधी विकी टियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. विकी आणि टियाचे फोटोही व्हायरल झाले होते.
8 / 10
टिया बाजपेयी म्हणजेच ट्विंकल अभिनेत्रीबरोबरच एक गायिकाही आहे. सारेगमप या शोमुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती.
9 / 10
तिने अनेक मालिकांमध्येही काम केलं आहे. 'घर की लक्ष्मी बेटियां' आणि 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकांमध्ये ती झळकली होती.
10 / 10
'1920 : एव्हिल रिटर्न' या सिनेमातही टिया महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. टियाने आणि विकीमध्ये काही कारणांमुळे ब्रेकअप झालं होतं. त्या दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपबाबत कधीच उघडपणे भाष्य केलं नाही.
टॅग्स :अंकिता लोखंडेबिग बॉसटिव्ही कलाकार