PHOTOS : ‘Bigg Boss 15’मध्ये सुरू झालेली ‘ही’ लव्हस्टोरी अखेर संपली...! ईशान व मायशाचं ब्रेकअप...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 15:54 IST
1 / 8‘बिग बॉस 15’चे लव्ह बर्ड्स ईशान सहगल आणि मायशा अय्यर या दोघांनी बिग बॉसच्या घरात नुसता धुमाकूळ घातला होता. अगदी शो सुरू होऊन आठवडा होत नाही तोच, ईशान व मायशा यांच्यात प्रेम फुललं होतं. 2 / 8पहिल्याच आठवड्यात ईशान व मायशा प्रेमात पडलेले पाहून पाहून सलमान खानही अवाक झाला होता. ईशान सहगल व मायशा अय्यर दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की, आपण नॅशनल टीव्हीवर आहोत, याचाही त्यांना विसर पडला होता. 3 / 8अगदी नॅशनल टीव्हीवर एकच ब्लँकेट शेअर करण्यापासून किस करेपर्यंतच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या होत्या. सलमानने वेळोवेळी दोघांनाही समज दिली होती. शोमध्ये फक्त रोमान्स चालणार नाही. खेळ दाखवा, अशा स्पष्ट शब्दांत सलमानने ईशान व मायशाला समजावलं होतं. पण दोघांवरही याचा काही परिणाम झाला नव्हता.4 / 8आत्ता या कपलबद्दल आम्ही का बोलतोय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर कारण आहे. होय, बिग बॉस 15 मध्ये फुललेली ही लव्हस्टोरी आता संपली आहे. ईशान आणि मायशाचं ब्रेकअप झालं आहे. खुद्द ईशानने याचा खुलासा केला आहे.5 / 8दोन महिन्यांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं. आत्ता दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. अलीकडे ईशानने एका मुलाखतीत ब्रेकअपची न्यूज कन्फर्म केली.6 / 8काही गोष्टी काम करत नव्हत्या. माझ्या मते, आम्ही एकमेकांसाठी बनलो नव्हतोच. आमचे विचार सारखे नव्हते. आता मात्र आमचे मार्ग वेगळे झाले आहेत, असं ईशान म्हणाला.7 / 8बिग बॉसमध्ये आमचं नातं बहरलं. पण शोमधली परिस्थिती वेगळी होती. आम्ही बाहेर आल्यावर आम्ही रिअल लाईफ खूप वेगळी होती. माझ्या मते, जे काही झालं ते चांगलं झालं, असंही ईशान म्हणाला.8 / 8मी या नात्यात खूप गुंतलो होतो. मी या नात्याला खूप काही दिलं. साहजिक ब्रेकअप माझ्यासाठी सोपं नाही. पण मी आता पुढे गेलो आहे. मी आता आनंदी आहे, असंही ईशानने सांगितलं.