बालिका वधू से 'वधू' तक! अभिनेत्री अविका गौरचा वेडिंग अल्बम समोर, कोण आहे तिचा नवरा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:10 IST
1 / 10'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अविकाने नॅशनल टेलिव्हिजनवर 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये मिलिंद चंदवानीसह सात फेरे घेतले. 2 / 10काही महिन्यांपूर्वीच त्यांचा साखरपुडा झाला होता. आता अविका आणि मिलिंद लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. 3 / 10लग्नासाठी अविकाने खास लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. खड्यांची ज्वेलरी घालत नववधू नटली होती. 4 / 10तर मिलिंद बदामी रंगाच्या शेरवानीमध्ये हँडसम दिसत होता. 5 / 10लग्नाचे फोटो अविकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. 'बालिका से वधू तक' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 6 / 10अविका आणि मिलिंदच्या लग्नासाठी टीव्हीवरील अनेक कलाकार सहभागी झाले होते.7 / 10अविकाच्या फोटोंवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींना तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 8 / 10अविकाचा नवरा मिलिंद चंदवानीने आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेतलं आहे. नंतर त्याने इन्फोसिसमधून करिअरला सुरुवात केली.9 / 10२०१८ मध्ये त्याने कॅम्पस डायरीज या एनजीओची स्थापना केली. एमटीव्ही रोडीज शोमध्येही त्याने सहभाग घेतला होता.10 / 10मिलिंद आणि अविकाची भेट त्याच्या एनजीओच्या एका इव्हेंटमध्ये झाली. दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले.