By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:49 IST
1 / 10टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय चेहरा अशनूर कौर (Ashnoor Kaur) सध्या तिच्या जबरदस्त फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. 2 / 10'बिग बॉस'च्या घरात असताना अशनूरला तिच्या वाढलेल्या वजनामुळे प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. ज्यामुळे वादही निर्माण झाला होता.3 / 10मात्र, केवळ सहा महिन्यांत अशनूरने स्वतःमध्ये (Ashnoor Kaur Weight Loss) असा काही बदल केला आहे की, तिला पाहून चाहते थक्क झाले आहेत4 / 10अशनूर म्हणाली, 'लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. पण कॅमेऱ्यासमोर चांगलं दिसणं ही कामाची गरज आहे. बिग बॉसमध्ये असताना माझ्याकडे माझी आवश्यक औषधे नव्हती, त्यामुळे हार्मोनल असंतुलनामुळे माझे वजन आणखी वाढले होते'.5 / 10अशनूरने स्वतः या ट्रान्सफॉर्मेशनबद्दल बोलताना सांगितले की, 'यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मी गेल्या ६ महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. बिग बॉसहून बाहेर आल्यानंतर मी पुन्हा सुरुवात केली. मेहनतीचं फळ मिळतंच'.6 / 10अशनूरने सांगितले की, वजन नियंत्रणात आणण्यासाठी ती सलग अडीच महिने फक्त लिक्विड डाएटवर होती.7 / 10अशनूर म्हणाली, 'मी दिवसातून दोन वेळा मी व्यायाम करते. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी २ ते अडीच तास व्यायाम करते. तसेच संध्याकाळी अर्धा ते ४५ मिनिटे चालण्याचा व्यायामही करते'.8 / 10२१ वर्षीय अशनूर कौर लहानपणापासूनच इंडस्ट्रीत सक्रिय आहे. अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर ती 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाली होती. 9 / 10अशनूरने ती १९ वर्षांची असतानाच मुंबईत एक आलिशान घर विकत घेतले होते. ज्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. तसेच जेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती, तेव्हा तिने स्वतःचा मेकअप ब्रँड लाँच केला होता.10 / 10अशनूरची मालमत्ता कोट्यवधींच्या घरात आहे. ती टीव्ही शो, ब्रँड प्रमोशन आणि सोशल मीडियाद्वारे मोठी कमाई करते. अंदाजे तिची नेटवर्थ १६ ते २५ कोटी रुपये आहे.