Join us  

‘अनुपमा’च्या या अभिनेत्रीने वयाच्या 43 व्या वर्षी केले ग्लॅमरस फोटोशूट, फोटो पाहून चाहतेही थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 8:00 AM

1 / 10
‘अनुपमा’ या सध्या टीआरपी लिस्टमध्ये अव्वल असलेल्या मालिकेची लीड अ‍ॅक्ट्रेस रूपाली गांगुली सध्या जाम चर्चेत आहे.
2 / 10
कारण काय तर तिचे नवे फोटोशूट. होय, तिचे हे फोटोशूट पाहून चाहतेही थक्क होतील.
3 / 10
अनुपमा या मालिकेत रूपाली गांगुली अगदी साध्या सरळ महिलेच्या भूमिकेत असली तरी ख-या आयुष्यात ती चांगलीच ग्लॅमरस आहे.
4 / 10
याचा प्रत्यय तुम्हाला तिचे हे ताजे फोटो पाहिल्यानंतर येईल. यातील तिचा अवतार आॅनस्क्रीन रोलच्या अगदी विरूद्ध आहे.
5 / 10
रूपाली गांगुलीने वयाची चाळीशी कधीच पूर्ण केली आहे. सध्या ती 43 वर्षाची आहे.
6 / 10
रूपालीने टीव्ही इंडस्ट्रीत प्रचंड काम केले आहे. टीव्हीचा ती एक लोकप्रिय चेहरा आहे.
7 / 10
संजीवनी या मालिकेतून रूपाली गांगुली नावारूपास आली होती. या मालिकेने तिला एक नवी ओळख दिली होती.
8 / 10
अनुपमा या मालिकेबद्दल सांगायचे तर सध्या ही मालिका टीआरपी लिस्टमध्ये अव्वल आहे आणि सध्या रूपाली गांगुली टीव्हीची नंबर वन अ‍ॅक्ट्रेस बनली आहे.
9 / 10
1985 साली वयाच्या 7 व्या वर्षी साहेब या मालिकेतून तिने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती.
10 / 10
2000 साली सुकन्या या मालिकेतून तिने टीव्हीवर डेब्यू केला होता.
टॅग्स :टेलिव्हिजन