‘अनुपमा’ची ‘नंदिनी’ इंडस्ट्रीतील ढोंगीपणाला कंटाळली...! मालिकाचं नाही तर अॅक्टिंगही सोडली...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 15:06 IST
1 / 8टीव्हीची नंबर 1 हिंदी मालिका ‘अनुपमा’मधील नंदिनी अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री अनघा भोसलेने अलीकडे मालिकेला रामराम ठोकला होता. आता तिने काही काळासाठी अॅक्टिंगच्या दुनियेलाच गुडबाय केला आहे.2 / 8होय, अनुपमा फेम अभिनेत्री अनघा भोसले हिने काही काळासाठी अॅक्टिंग सोडली आहे. केवळ मालिकेलाच नाही तर अभिनय जगताला देखील तिने अलविदा म्हटलं आहे. 3 / 8 अनघाच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. पण अनघाने आता शांतीच्या शोधात अध्यात्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे.4 / 8अलीकडे ‘टेलिचक्कर’ला दिलेल्या मुलाखतीत अनघा बोलली. इंडस्ट्रीतील ढोंगीपणामुळे मी त्रस्त झाले असून या इंडस्ट्रीत पुढे काम करण्याची इच्छा नसल्याचे अनघाने यावेळी स्पष्ट केलं. 5 / 8 इंडस्ट्रीतील सर्वच लोक खरे नसतात. इथे प्रत्येक पावलावर दुटप्पी, ढोंगी लोक भेटतात. तुम्ही नसलेली व्यक्ती होण्यासाठी तुमच्यावर सतत दबाव असतो. स्पर्धा इतकी की, सगळेच एकमेकांना तुडवत समोर जाण्याच्या प्रयत्नात दिसतात, असं ती म्हणाली.6 / 8इंडस्ट्रीत अगदी सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचाही सतत दबाव असतो. मला आता शांती हवी आहे. म्हणूनच मला नकारात्मक गोष्टी सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारायचा आहे. मी अॅक्टिंग सोडण्याचा निर्णय अधिकृतपणे जाहीर केलेला नाही. कदाचित मला मालिकेत बोलवलं तर मी जाईलही. पण भविष्यात अॅक्टिंग सोडायची माझी इच्छा आहे, असं ती म्हणाली.7 / 8सहकलाकार पारस कालनावतनेही अनघाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मला अनघासोबत शूटिंग करायची सवय झाली आहे. आम्ही दोघे चांगले मित्र झालो होतो आणि मला तिची खूप आठवण येईल,’ असं तो म्हणाला.8 / 8 मी तिच्या निर्णयावर फार काही बोलणार नाही. तो तिचा निर्णय आहे आणि मी त्याचा आदर करतो. पण तिला अभिनयाची आवड असेल तर ती नक्कीच परत येईल. मला आशा आहे की ती लवकरच मालिकेमध्ये दिसेल, असं तो म्हणाला.