Join us
Daily Top 2Weekly Top 5

तू कोकणी असल्याचा गर्व! अंकिता वालावलकरच्या साडीच्या पदरावर नारळाचं झाड; 'कान्स'मधील लूक व्हायरल, चाहत्यांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 16:15 IST

1 / 7
Cannes 2026: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने हजेरी लावत कोकणची मान उंचावली.
2 / 7
अंकिताने कान्सच्या रेड कार्पेटसाठी मराठमोळा लूक केला होता. गुलाबी रंगाची पैठणी साडी नेसून ती रेड कार्पेटवर अवतरली.
3 / 7
अंकिताच्या लूकमधूनही कोकणची झलक पाहायला मिळाली. तिच्या पदरावर नारळाच्या झाड कोरलेलं होतं.
4 / 7
केसांचा बन बांधून अगदी साधा लूक तिने केला होता. गळ्यात चोकर आणि मोत्याचे दागिने तिने घातले होते.
5 / 7
कोकण हार्टेड गर्लला कान्सच्या रेड कार्पेटवर पाहून चाहतेही सुखावले. अंकिताने शेअर केलेल्या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
6 / 7
'कोकणची शान', 'तू कोकणी असल्याचं अभिमान' अशा कमेंट चाहत्यांनी अंकिताच्या या फोटोंवर केल्या आहेत.
7 / 7
अंकिताचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील लूक चाहत्यांनाही आवडला आहे. अभिजात मराठी ओटीटी जागतिक लाँचसाठी अंकिता कान्समध्ये सहभागी झाली होती.
टॅग्स :कान्स फिल्म फेस्टिवलअंकिता प्रभू वालावलकरटिव्ही कलाकार