गुलाबी थंडी अन् अंकिता-विकीचे cosy Photos, थाटात साजरा केला लग्नाचा तिसरा वाढदिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:14 IST
1 / 8बिग बॉस १७ मध्ये सहभागी झालेलं सर्वात रोमँटिक कपल म्हणजे अंकिता लोखंडे(Ankita Lokhande)-विकी जैन (Vicky Jain). बिग बॉसमुळे या कपलला कमालीची लोकप्रियता मिळाली. त्यांच्या गुड लूक्सवर चाहते फिदा झाले.2 / 8कालच १४ डिसेंबर रोजी त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली. यानिमित्त त्यांनी एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम घालवला. याची झलक अंकिताने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दाखवली.3 / 8अंकिता आणि विकीने एकमेकांसोबतचे काही कोजी फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघंही हुडी, कानटोपी घालून आहेत. गुलाबी थंडीचा दोघंही खरोखर आनंद घेत आहेत.4 / 8दोघांची जोडी खूप गोड दिसत आहे. तसंच त्यांच्या फॅशन सेन्सची तर बातच न्यारी आहे. कोणत्याही फोटोंमध्ये त्यांची फॅशन टू द पॉइंट असते. 5 / 8या फोटोंना कॅप्शन देत अंकिताने लिहिले, 'एकदा लग्न झालं की आणखी काय हवं असतं? शक्य तितकं एकमेकांसोबत असणं, मजेशीर पार्टनरशिप, जगा आणि जगू द्या हा मंत्र. आम्हीही एकमेकांना हीच कमिटमेंट दिली आहे आणि आमच्यातलं प्रेम कधीच कमी होणार नाही असं वचनही दिलं आहे.'6 / 8त्यांच्या या पोस्टवर कलाकार आणि चाहत्यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अंकिताचा तर आधीपासूनच मोठा चाहतावर्ग आहे. शिवाय बिग बॉसनंतर आता विकीचेही अनेक चाहते झाले आहेत.7 / 8अंकिता आणि विकीने २०२१ साली मुंबईच्या ग्रँड हयात मध्ये लग्न केलं. अंकिताने मनीष मल्होत्राने डिझाईन केलेला लेहेंगा परिधान केला होता. अतिशय ग्रँड पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता.8 / 8विकी जैन हा मोठा बिझनेसमन आहे. मुंबईत त्यांचा ८ बीएचके आलिशान फ्लॅट आहे. शिवाय बरीच संपत्तीही आहे.