Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतनंतर आता 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्री अडकली लग्न बंधनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 15:27 IST

1 / 6
मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळत आहे. नुकतेच मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत हिने सिद्धेश चव्हाणसोबत लग्नगाठ बांधली आहे. दरम्यान आता मराठी टेलिव्हिजन जगतातील आणखी एक अभिनेत्री विवाह बंधनात अडकली आहे. ही अभिनेत्री म्हणजे रात्रीस खेळ चाले फेम मंगल राणे.
2 / 6
अभिनेत्री मंगल राणे हिने फोटोग्राफर असलेल्या संतोष पेडणेकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 6
मिसेस पेडणेकर असे कॅप्शन देत तिने लग्नाचे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
4 / 6
रात्रीस खेळ चाले मालिकेतील दुसऱ्या पर्वात शोभाची भूमिका देखील विशेष गाजलेली पाहायला मिळाली. ही भूमिका अभिनेत्री मंगल राणे हिने साकारली होती.
5 / 6
मंगल ही थिएटर आर्टिस्ट आहे. नाटकातून काम करत असताना रडू, रात्रीस खेळ चाले, क्षेत्रपाल श्री देव वेतोबा, संत गजानन शेगावीचे अशा चित्रपट, मालिकांमधून तिला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. शोभाच्या भूमिकेने मंगल प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती.
6 / 6
मंगल राणे ही कोकणातलीच असल्याने तिला मालवणी भाषा चांगली अवगत आहे. तिने स्थानिक नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमातून नेहमीच सहभाग दर्शवला होता.
टॅग्स :रात्रीस खेळ चाले