Join us

गोविंदाच्या भाचीने केलं धर्म परिवर्तन? ख्रिश्चन झाल्याच्या चर्चांवर रागिनी खन्नाने दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:22 IST

1 / 7
'ससुराल गेंदा फूल' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रागिनी खन्ना (Ragini Khanna) सध्या चर्चेत आहे. तिने धर्मपरिवर्तन केल्याच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत आहेत.
2 / 7
रागिनी अभिनेता गोविंदाची भाची आहे. तिने खरंच धर्मपरिवर्तन केलं का? यावर आता रागिनीने स्वत:च मौन सोडलं आहे. यामागचं सत्य काय ते तिने सांगितलं आहे.
3 / 7
रागिनी खन्ना अनेक वर्षांपासून स्क्रीनवरुन गायब आहे. 'ससुराल गेंदा फूल' मालिकेनंतर तिने काही शो होस्ट केले होते. मात्र गोविंदाची भाची असण्याचा रागिनीला करिअरमध्ये फारसा फायदा झाला नाही.
4 / 7
रागिनीला हळूहळू काम मिळणंच बंद झालं. तिचे एकता कपूरसोबतही काही मतभेद झाल्याची चर्चा आहे ज्यामुळे तिच्या करिअरवर परिणाम झाला.
5 / 7
नुकतंच रागिनीने एका मुलाखतीत धर्मपरिवर्तनाच्या चर्चांवर खुलासा केला. ती म्हणाली, 'मी येशूला मानते. पण मी धर्मपरिवर्तन केलेलं नाही. मी दर रविवारी चर्चेमध्ये जाते. माऊंट मेरीला जाते. बास इतकंच. माझा प्रत्येक धर्मावर विश्वास आहे.'
6 / 7
'पण मी कधीच धर्मपरिवर्तन केलेलं नाही. मी जन्माने पंजाबी आहे आणि आजही पंजाबीच आहे. जेव्हा लग्न करेन तेव्हा कदाचित माझा धर्म बदलेल. मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. माझं येशूवर प्रेम आहे.'
7 / 7
'माझी आजी खूप धार्मिक होती. ब्रह्म मुहुर्तावर ती पूजा करायची. अभिनेत्रीही आणि गायिकाही होती. नंतर ती साध्वी बनली. तिने आम्हाला शिस्तीत मोठं केलं आहे. आमच्यासाठी तीच संपत्ती आहे.'
टॅग्स :टिव्ही कलाकारहिंदू