Join us

'सावळ्याची जणू सावली' फेम अभिनेत्रीचं वय माहितीये का? इतक्या कमी वयात मिळवलं यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 18:33 IST

1 / 7
'सावळ्याची जणू सावली' मालिका म्हटलं की अभिनेत्री प्राप्ती रेडकर डोळ्यासमोर येते. 'सावली'च्या भूमिकेतून ती घरोघरी पोहोचली आहे. प्रेक्षकांचंही तिला भरपूर प्रेम मिळतंय.
2 / 7
प्राप्ती रेडकरने याआधी काही मालिकांमध्येही काम केलं आहे. 'किती सांगायचंय मला','तू माझा सांगाती','मेरे साई' आणि 'काव्यांजली'मध्ये ती दिसली आहे.
3 / 7
प्राप्तीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तसंच तिची आणखी एक आवड म्हणजे कराटे. तिने कराटेत ब्लॅक बेल्ट सुद्धा पटकावला आहे. शिवाय ती किक बॉक्सिंगही शिकली आहे.
4 / 7
प्राप्तीच्या टॅलेंटचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. अभिनय कौशल्यातून तर तिने सर्वांचं मन जिंकलंच आहे. तसंच ती उत्तम डान्सरही आहे.
5 / 7
प्राप्तीचा जन्म ४ एप्रिल रोजी झाला. ती फक्त २१ वर्षांची आहे. वाढदिवसाच्या पोस्टमध्ये यावर्षी तिने २१ alredy? असं कॅप्शन तिने लिहिलं होतं.
6 / 7
वयाच्या फक्त २१ व्या वर्षी प्राप्तीने हे यश मिळवलं आहे. अभिनेत्री, किकबॉक्सर अशी तिची ओळख तिने आपल्या सोशल मीडियावर लिहिली आहे.
7 / 7
प्राप्तीचे इन्स्टाग्रामवर ९३ हजार फॉलोअर्स आहेत. कधी साडीत तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये तिने फोटो पोस्ट केले आहेत. तिच्या प्रत्येक फोटोवर चाहते लाईक्सचा वर्षाव करतात.
टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारटेलिव्हिजन