'शक्तिमान' फेम अभिनेत्री आठवतेय? आईच्या निधनानंतर झाली संन्यासी; पतीनेही दिला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:49 IST
1 / 6मनोरंजनविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी गेल्या काही काळात अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. करिअरचा त्याग करुन बऱ्याच जणांनी थेट संन्यासही घेतला आहे. 2 / 6अशीच एक टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री जिने १५० लेक्षा जास्त मालिका, टीव्ही शो केले ती आज हिमालयात गेली आहे. धर्मासाठी ती संन्यासी बनली आहे. 3 / 6ही अभिनेत्री आहे नुपूर अलंकार. 'शक्तिमान' मालिकेत तिची भूमिका आठवत असेलच. याशिवाय ती 'दीया और बाती हम','राजा जी और घर की लक्ष्मी बेटिया','अगले जन्म मोहे बिटिया ही किजो' अशा अनेक मालिकांमध्येही ती दिसली.4 / 6 २००२ साली नुपुरने अलंकार श्रीवास्तवसोबत लग्न केलं. तर तीन वर्षांपूर्वी मात्र अचानक तिने करिअर सोडलं. अध्यात्माचा मार्ग निवडल्याने तिने पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. नुपुरचा पती आणि सासू-सासऱ्यांनी तिच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.5 / 6नुपूरने गुरु शंभू शरण झा यांच्या मार्गदर्शनाखाली संन्यासी जीवनाचा स्वीकार केला. एका मुलाखतीत नुपूर म्हणाली होती की आईच्या निधनानंतर माझं कशातच लक्ष लागलं नाही. यामुळेच तिने कुटुंबाशी चर्चा करुन कायमचं अध्यात्माच्या मार्गाला जाण्याचा निर्णय घेतला. 6 / 6नुपुर सध्या भिक्षा मागून आयुष्य जगत आहे. भगवे कपडे घालून ती धार्मिक स्थळांवर दिसते. या मार्गावर ती आनंदी असल्याचंही सांगते.