Join us
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळाच्या या अभिनेत्रीने केले टक्कल, चाहत्यांना बसतोय आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 14:56 IST

1 / 8
जया भट्टाचार्यने लुक्सची पर्वा न करता टक्कल केले आहे. आपल्या या बाल्ड लुकचे अनेक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 8
व्हिडीओ शेअर करताना जयाने लिहिले आहे की, ‘सरप्राइज, अनेक दिवसांपासून हे करायचे होते. पण यासाठी कधीच इतके मोटिव्हेशन मिळाले नाही. घरचे याच्या विरोधात होते. ते मला नेहमीच लांब केस ठेवायला सांगत.
3 / 8
तिने पुढे लिहिले आहे की, मी ज्या इंडस्ट्रीत आहे तिथे लुक्स महत्त्वाचे आहे. पण माझ्यासाठी अ‍ॅक्टिंग महत्त्वाची आहे. त्यामुळे मी टक्कल करण्याचा निर्णय घेतला. माझे केस मी सांभाळून ठेवले आहेत. हे केस मी कॅन्सर रूग्णांसाठी विग बनवण्यासाठी देणार. ’
4 / 8
जयाने झांसी की रानी, थपकी प्यार की, क्योंकी साँस भी कभी बहू थी, बनू मैं तेरी दुल्हन, हातिम, कसम से, गंगा, कैसा ये प्यार है, जय हनुमान, करम अपना अपना, अंबर धारा अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.
5 / 8
जयाला खरी लोकप्रियता ही क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती.
6 / 8
जया गेल्या अनेक वर्षांपासून मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत आहे. तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे.
7 / 8
जयाने देवदास, लज्जा यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.
8 / 8
जया नुकतीच दिल्ली क्राईम या वेबसिरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.
टॅग्स :टेलिव्हिजन