By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 10:50 IST
1 / 7'बालिका वध', 'क्राइम पेट्रोल', 'सावधान इंडिया','हप्पू सिंह की उल्टन पलटन' यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेली अभिनेत्री गीतांजली मिश्रा माहितीये?2 / 7गीतांजली मिश्रा आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ करते. सध्या ती 'हप्पू सिंह की उल्टन पलटन' मालिकेत इन्सपेक्टर राजेश सिंह हे विनोदी पात्र साकारत आहे. मात्र गीतांजली निगेटिव्ह भूमिकांसाठीही ओळखली जाते.3 / 7३९ वर्षांची गीतांजली मिश्रा आजही सिंगल आहे. बहिणीच्या निधनानंतर तिने दोन्ही भाच्यांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. या कारणाने तिने स्वत: लग्नच केलं नाही. यामुळे तिच्या आईला अनेकांचे टोमणे ऐकावे लागले. 4 / 7गीतांजली मूळची वाराणसीची आहे मात्र तिचा जन्म मुंबईतच झाला. लहानपणीच वडिलांचं निधन झाल्यानंतर आईने एकटीने लेकींचा सांभाळ केला. एका मुलाखतीत गीतांजली म्हणालेली की, 'मी ५ वर्षांची होते तेव्हा आईसोबत मुंबईत आले. मुंबईत आईने दूध आणि भाजी विकून घर चालवलं.5 / 7माझी मोठी बहीण होती जिचं २०१७ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. बहिणीला एक १४ वर्षांचा आणि एक ५ वर्षांचा मुलगा होता. त्यांच्याकडे बघणारं कोणीच नव्हतं. तसंच मला त्यांना दत्तक घेण्याची परवानही कायद्याने नव्हती.6 / 7तरी मी त्यांचा सांभाळ केला आणि लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मला कदाचित चांगला नवरा मिळाला असता पण या मुलांना चांगला पिता मिळणार नाही, असं गीतांजली म्हणाली होती.7 / 7मी नंतर अभिनयात आले तेव्हा अनेकांनी माझ्या आईला टोमणे मारले. पण जेव्हा मी लोकप्रिय झाले तेव्हा तेच नातेवाईक आमच्या आजूबाजूला फिरु लागले.