Join us  

अभिनेत्री आशका गोराडियाने सिनेइंडस्ट्रीला केला रामराम, चाहते झाले नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 3:41 PM

1 / 9
टेलिव्हिजन इंडस्ट्रीत चांगले नाव कमाविल्यानंतर अभिनेत्री आशका गोराडियाने अभिनयाला अलविदा केला आहे.
2 / 9
आशकाने आपल्या करिअरमध्ये 'लागी तुझसे लगन' आणि 'कुसुम' या हिट मालिकांमध्ये काम केले आहे. मात्र तिने घेतलेल्या निर्णयामुळे चाहते नाराज झाले आहेत.
3 / 9
आशका गोराडिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि नेहमी योगा करताना दिसते.
4 / 9
ती बऱ्याच काळापासून सिनेइंडस्ट्रीपासून दूर आहे आणि आपल्या पतीसोबत क्वॉलिटी टाइम स्पेन्ड करत असते.
5 / 9
आशका गोराडियाने सांगितले की, सध्या ती भविष्यातील आंत्रेप्रेन्योरशिपवर लक्ष देणार आहे.
6 / 9
मात्र तिच्या चाहत्यांना तिला टीव्ही स्क्रीनवर पहायचे आहे. मात्र तिने स्पष्ट सांगितले की, सध्या ती असे काही करणार नाही.
7 / 9
बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आशकाने सांगितले की, बिझनेस माझ्या रक्तातच आहे आणि अभिनय नशीबात होती निघून गेली. आता अभिनयाला अलविदा करण्याची वेळ आली आहे. हा निर्णय कायमस्वरूपी आहे आहे की आतासाठी ते पुढे समजेल.
8 / 9
आशका गोराडिया सध्या गोव्यात नवरा ब्रेंट गोबलसोबत राहते आहे. दोघांनी २०१७ साली लग्न केले होते.
9 / 9
शेवटची ती २०१९ साली डायन मालिकेत झळकली होती. तिने बऱ्याच रिएलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.
टॅग्स :आशका गोराडिया