By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 11:29 IST
1 / 15टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी (Siddhaanth Vir Surryavanshi ) याच्या अकाली निधनाच्या बातमीने मनोरंजन विश्व हादरलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 15सिद्धांत जिममध्ये वर्कआऊट करत होता. वर्कआऊट करताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो जमिनीवर कोसळला. (फोटो इन्स्टाग्राम)3 / 15 त्याला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सिद्धांत केवळ 46 वर्षांचा होता. त्याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)4 / 15सिद्धांत वीर सूर्यवंशी यांने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. (फोटो इन्स्टाग्राम)5 / 15सिद्धांतला आनंद सूर्यवंशी या नावानंही ओळखलं जात असे. झी टीव्हीवरच्या ममता या मालिकेत त्याने साकारलेली अक्षयची भूमिका प्रचंड गाजली होती. (फोटो इन्स्टाग्राम)6 / 15'कुसुम' या मालिकेतून त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केले. याशिवाय सिद्धांत वीर सूर्यवंशी यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले.(फोटो इन्स्टाग्राम)7 / 15 'कसौटी जिंदगी की', 'कृष्ण अर्जुन', 'क्या दिल में है' मालिकांमुळे सिद्धांत वीर सूर्यवंशी हे नाव घराघरात पोहोचले. 'क्यों रिश्तों में कट्टी बत्ती' आणि 'जिद्दी दिल' हे त्यांचे शेवटचे प्रोजेक्ट होते. (फोटो इन्स्टाग्राम)8 / 15सिद्धांत त्याच्या पर्सनल लाईफमुळेही अनेकदा चर्चेत आला होता. सिद्धांतने दोन लग्न केली होती. (फोटो इन्स्टाग्राम)9 / 15 २००१ मध्ये त्यांने ईरा सुर्यवंशीसह लग्नगाठ बांधली होती. २०१५ मध्ये पहिली पत्नी इरा सूर्यवंशीपासून तो वेगळे झाला. (फोटो इन्स्टाग्राम)10 / 15सिद्धांत व ईराला डिजा ही मुलगी आहे. घटस्फोटानंतरही सिद्धांत मुलीसोबत जवळचे संबंध होते. (फोटो इन्स्टाग्राम)11 / 15मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धांतचं त्याची सहकलाकार प्रिया भटीजाबरोबर अफेअर होतं. प्रियामुळेच त्याने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट होण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जातं. (फोटो इन्स्टाग्राम)12 / 15यानंतर त्याने २०१७ साली सिद्धांतने ‘खतरो के खिलाडी’ फेम रशियन मॉडेल अलिशिया राऊतसह नव्या आयुष्याची सुरुवात केली. (फोटो इन्स्टाग्राम)13 / 15सिद्धांत प्रमाणे अलिशियाचं हे दुसरं लग्न असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगा आहे.(फोटो इन्स्टाग्राम)14 / 15सिद्धांत त्याच्या कुटुंबासाठी जवळपास पाच ते दहा कोटींची संपत्ती सोडून गेला असल्याची माहिती आहे.(फोटो इन्स्टाग्राम)15 / 15