Join us
Daily Top 2Weekly Top 5

Ruhanika Dhawan : १५ व्या वर्षीच मुंबईत स्वकमाईतून घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:03 IST

1 / 8
वयाच्या केवळ १५ व्या वर्षी एका मुलीने स्वत:च्या कमाईतून मुंबईत घर घेतले आहे. 'ये है मोहोब्बते' मधून प्रसिद्धीझोतात आलेली 'रुही' म्हणजेच रुहानिका धवन हिने स्वकमाईतून मुंबईत घर विकत घेतल्याची गुड न्यूज चाहत्यांना काही दिवसांपूर्वी दिली होती.
2 / 8
१५ व्या वर्षी मुंबईत स्वकमाईतून घर घेणं ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. रुहीच्या आई वडिलांना तिचा खूप अभिमान वाटतो. तर रुहीचे चाहते सुद्धा तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
3 / 8
रुहानिकाने तिच्या परिवारासोबत नवीन घरात नुकताच प्रवेश केला आहे. गृहप्रवेशाचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. काही वेळातच फोटोंना खूप लाईक्स मिळालेत.
4 / 8
नवीन घरात प्रवेश केल्याचा आनंद रुहानिकाच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. तिने स्वत: नव्या घरात पूजा ही केली आहे. कुटुंबासोबत नवीन घरात प्रवेश करताना वास्तुशांतीचे फोटो तिने पोस्ट केले आहेत.
5 / 8
यावेळी रुहानिकाचे संपूर्ण परिवार तिच्या आनंदाच्या क्षणी तिच्यासोबत उपस्थित आहे. आपल्या माणसांसाठी, स्वप्नांसाठी, वर्तमानासाठी, भविष्यासाठी, प्रत्येक चांगल्या आणि वाईट काळासाठी मी देवाचे आभार मानते. मी नेहमीच ईश्वर, गुरु, पिता, माता, पृथ्वी समोर नतमस्तक राहीन असे कॅप्शन तिने इन्स्टाग्राम पोस्टवर दिले आहे.
6 / 8
रुहानिकाने आईसोबतच सारख्याच रंगाचा आऊटफिट घातला होता. पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पिवळ्या रंगाच्या लॉंग स्कर्टमध्ये रुहानिका खूप सुंदर दिसत होती.
7 / 8
हे नवीन घर तिने फुलांनी सजवले होते. नवीन घरातील तिने स्वत:चे सोलो फोटो सुद्धा शेअर केले आहेत.
8 / 8
सध्या रुहानिकाचे सगळीकडूनच कौतुक होत आहे. मालिकेतील सहकलारांनीही तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय.
टॅग्स :ये है मोहब्बतेंमुंबईसुंदर गृहनियोजन