Join us

tejasswi Prakash : टीव्हीवरची टॉप अभिनेत्री आहे तेजस्वी, पण मिळत नाही चित्रपट; ऑडिशनमध्ये झाली रिजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 18:27 IST

1 / 9
टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा चेहरा असलेल्या तेजस्वी प्रकाशला आता चित्रपटांमध्ये रस आहे. टीव्हीवरून चित्रपटांकडे वळल्याचं तिने म्हटलं आहे.
2 / 9
तेजस्वीसाठी हे करणं फार सोपं नव्हतं. काही वर्षे टीव्ही इंडस्ट्रीपासून ब्रेक घेतल्यानंतर तिला एक मराठी चित्रपट मिळाला. पण हिंदी चित्रपट अजूनपर्यंत मिळालेला नाही.
3 / 9
पिंकव्हिलाशी बोलताना तेजस्वी म्हणाली, 'टीव्ही कलाकार चित्रपटांसाठी ओव्हर एक्सपोज्ड असतात. मी दोन चित्रपट केले आणि निर्मात्यांना माझ्यासोबत काम करण्यास रस होता असं दिसून आलं.
4 / 9
'पण हो, मी अशा काही ऑडिशन दिल्या आहेत जिथे मला रिजेक्शन मिळालं आहे कारण मी ओव्हर एक्सपोज्ड आहे.'
5 / 9
'ते मला असं लॉजिक देत होते की, तुला आधीच इतकं पाहिलं आहे, मग लोक आता तुला चित्रपटात का पाहतील?'
6 / 9
'मला हे लॉजिकच पटलं नाही. इतके टीव्ही कलाकार चित्रपट करत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. मला त्यांचं हे विधान विचित्र वाटलं.'
7 / 9
'जर मी स्क्रिनवर दिसते तर याचा अर्थ लोकांना मला पाहायचं आहे.पण मला असंही वाटतं की निर्मात्यांचा दृष्टिकोन काही गोष्टींमध्ये हळूहळू पण निश्चितच बदलत आहे.'
8 / 9
तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
9 / 9
टॅग्स :तेजस्वी प्रकाशटिव्ही कलाकार