By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 15:08 IST
1 / 9तन्वी कोलते 'लक्ष्मी निवास' मालिकेमुळे घराघरात पोहोचली. मालिकेत तिने सिंचनाची भूमिका साकारली होती ज्याला खूप लोकप्रियता मिळाली.2 / 9तन्वीने अचानक ही मालिका सोडली आणि ती आता बिग बॉस मराठी सीझन ६ मध्ये सहभागी झाली. या मालिकेआधीही तन्वी २-३ मालिकांमध्ये साईड रोल्समध्ये दिसली आहे.3 / 9इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत तन्वीने एक किस्सा सांगितला. एका मालिकेच्या सेटवरच तिला चारचौघात कचरा म्हटलं गेलं होतं. ती गोष्ट तिच्या मनाला खूप लागली होती.4 / 9तन्वी म्हणाली, 'मी जिथे आधी काम करत होते तिथे एका व्यक्तीने मला सगळ्यांसमोर सुनावलं होतं की, 'तू वेस्ट आहे..तू कचरा आहेस कचरा.. कळतंय का तुला? तुला जे आयुष्यात करायचंय ना ते तू करत नाहीयेस. तू नको तिथे आहेस.'5 / 9'मी ते स्टेटमेंट मनाला लावून घेतलंय आणि पुढच्या ४ महिन्यात त्या व्यक्तीला दाखवून द्यायचंय की हा कचरा नव्हता. कदाचित तुमच्यासाठी तो कचरा होता. पण तिथून निघाल्यावर त्याने स्वत:ची लायकी ओळखली आणि तो आत्ता चांगल्या जागेवर आहे.'6 / 9'कदाचित मी कचऱ्यातच होते म्हणून मला कचरा नाव पडलं होतं. पण तो कचरा..कचरा नव्हता. त्याला कोणी ओळखलंच नव्हतं. ठीक आहे जे होतं चांगल्यासाठीच होतं.'7 / 9'आता तो कचरा स्वत:चं नाव करणार आहे. अस्तित्व निर्माण करणार आहे. मी त्या व्यक्तीचे आभारही मानते चार चौघात मला कचरा म्हणाला म्हणून मला माझी किंमत तरी कळली.'8 / 9'ती जागा माझ्यासाठी नाही हे मला समजलं. त्या जागेवरुन लवकर निघून कचरा हा शब्द स्वत:मागून काढायचा असा मी निर्धार केला. स्वत:ला सिद्ध करायचं हे मी ठरवलं.'9 / 9'तन्वी कोलते छोट्या गावातून आलेला ब्रँड आहे. जो शहरात आलाय आणि स्वत:च्या जीवावर मोठा होणार आहे'