कुठे गायब झाली 'ताल'मधली अभिनेत्री? म्हणाली, "कास्टिंग काऊचमुळे हातातून गेले सिनेमे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 14:54 IST
1 / 10'ताल' या गाजलेल्या सिनेमा ऐश्वर्या रायच्या सौंदर्य, डान्स आणि अभिनयाने सर्वांचंच मन जिंकलं होतं. या सिनेमात तिच्या दोन बहिणीही दाखवल्या होत्या. त्यातली इला ही बहीण आठवतेय का?2 / 10दिसायला सुंदर अशा इलाची भूमिका अभिनेत्री जिविधा शर्माने (Jividha Sharma) साकारली होती. नंतर जिविधाने २००२ साली मुख्य अभिनेत्री म्हणून 'ये दिल आशिकाना' हा सुपरहिट सिनेमा दिला. यानंतर तिची लोकप्रियता कमालीची वाढली. 3 / 10पण हिट सिनेमा देऊनही नंतर जिविधाचं करिअर फारसं घडलं नाही. याला कारण ठरलं कास्टिंग काऊच. नुकतंच लल्लंनटॉपला दिलेल्या मुलाखतीत जिविधाने खुलासा केला.4 / 10मुलाखतीत जिविधा शर्मा म्हणाली, 'ये दिल आशिकाना नंतर मी एनटीआर सोबत तेलुगू सिनेमा साईन केला. पण मला प्रोजेक्ट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. मी अनेकांना भेटत होते.'5 / 10'मला तडजोड करायला सांगितलं जायचं. मी त्यासाठी तयार नव्हते. तुम्ही माझ्याकडून २४ तास काम करुन घ्या, मी मेहनत घेईन पण मी तडजोड करणार नाही.'6 / 10'त्या काळात कास्टिंग काऊच हेच माझ्या करिअरमध्ये अडथळा ठरलं. हे चूक की बरोबर मी सांगत नाही पण तुम्ही सर्वांना एकाच तराजूत तोलता हे मला मान्य नव्हतं.'7 / 10'तुला काम करायचंय तर ठिके पण कॉम्प्रमाईज करावं लागेल असंच मला बोललं जायचं. सुरुवातीला मला समजायचंच नाही की नक्की काय करायचंय. पण जसं जसं मी लोकांना भेटत गेले तेव्हा मला या शब्दाचा अर्थ समजायला लागला.'8 / 10'तुला काम करायचंय तर ठिके पण कॉम्प्रमाईज करावं लागेल असंच मला बोललं जायचं. सुरुवातीला मला समजायचंच नाही की नक्की काय करायचंय. पण जसं जसं मी लोकांना भेटत गेले तेव्हा मला या शब्दाचा अर्थ समजायला लागला.'9 / 10'मग एकानंतर एक प्रोजेक्ट्स मिळणंच बंद झालं. अजय देवगण, इमरान हाश्मीसोबतच्या सिनेमांचा यात समावेश आहे. पण मी हार मानली नाही. मी या गोष्टीशी लढले. '10 / 10जिविधाने काही टीव्ही शोज केले. २००३ साली 'तुम बिन जाऊ कहां' या मालिकेत ती दिसली. पंजाबी सिनेमांमध्येही तिने काम केलं आहे. दिलजीत दोसांझची ती पहिली हिरोईन आहे.