Join us  

स्वानंदी-आशिषची संगीत नाईट; शेअर केले रोमॅण्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 9:04 AM

1 / 10
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत.
2 / 10
स्वानंदी आणि आशिष यांच्या घरी सध्या लग्नाची धामधूम सुरु आहे. त्यामुळे ही जोडी लग्नसोहळ्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत आहेत.
3 / 10
अलिकडेच स्वानंदीचा मेहंदी सोहळा पार पडला त्यानंतर नुकतीच या जोडीची संगीत नाईटही झाली.
4 / 10
स्वानंदी आणि आशिष ही जोडी मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधत आहे. त्यामुळे मेहंदी, हळद, संगीत असा प्रत्येक सोहळा ते एन्जॉय करत आहेत.
5 / 10
स्वानंदीने सोशल मीडियावर तिच्या संगीत नाईट्सचे म्हणजेच संगीत सोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
6 / 10
संगीत नाईटसाठी स्वानंदीने डार्क निळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला होता. तर, आशिषने काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला होता.
7 / 10
स्वानंदी आणि आशिष यांचा रोमॅण्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
8 / 10
आशिष कुलकर्णी आणि स्वानंदी हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
9 / 10
आशिषला 'इंडियन आयडॉल १२'मधून लोकप्रियता मिळवली आहे. आशिष कुलकर्णी हा गायक असून देशविदेशात तो त्याच्या गाण्याचे कार्यक्रम करतो.
10 / 10
२५ डिसेंबर रोजी ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली जाणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांची चर्चा रंगत आहे.
टॅग्स :स्वानंदी टिकेकरटेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार