Join us

'सैराट'ची 'सुमन अक्का' झाली होती बारावीत नापास, मग असा केला स्ट्रगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 06:00 IST

1 / 8
'सैराट' सिनेमाने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं. महाराष्ट्राच काय सगळीकडेच सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच सिनेमातून त्यांच्यातील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.
2 / 8
'सैराट' चित्रपटातील लहान पण दमदार सुमन अक्काच्या भूमिकेतून अभिनेत्री छाया कदम घराघरात पोहचली. सुमन अक्का या त्यांच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधले होते.
3 / 8
आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांची मनं जिंकली.'सैराट'च नाहीतर 'फँड्री' आणि 'रेडू' सिनेमातल्याही भूमिकेने रसिकांची पसंती मिळवली होती.
4 / 8
छाया कदम यांनी 'न्यूड' या सिनेमांत न्यूड मॉडेल्सची भूमिका साकारली होती. भूमिका परफेक्ट व्हावी यासाठी त्या प्रचंड मेहनत घेतात.
5 / 8
पण अभिनयात टॉप क्लास असणाऱ्या छाय़ा कदम या बारावीत नापास असल्याचे फार कमी जणांना माहीत आहे.
6 / 8
होय. हे खरंय. छाया कदम बारावीच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या. पण या अपयशाने त्या कधीही खचून गेल्या नाहीत. तर त्यावर मात करत आयुष्यात पुन्हा नव्याने काही तरी करण्यास सज्ज झाल्या.
7 / 8
छाया कदम सोशल मीडियावर प्रचंड फेमस आहेत.सोशल मीडियावर त्यांचे विविध अंदाजातील फोटो व्हायरल होत असतात.
8 / 8
त्यांचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो.
टॅग्स :सैराट 2