Join us

'झुकेगा नही साला' हे फक्त सिनेमापुरतंच, प्रत्यक्षात 'या' साऊथ सुपरस्टार्सना पोलिसांनी झुकवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:28 IST

1 / 9
हैदराबाद पोलीस बऱ्याच काळापासून शहरातील विविध ठिकाणी रंगीत काच किंवा काळी फिल्म वापरणाऱ्या चारचाकी वाहनांविरुद्ध विशेष मोहीम राबवत आहेत.
2 / 9
या मोहिमेत अनेक वाहनांची ओळख पटवली जाते आणि वाहनचालकांना त्याच ठिकाणी खिडक्यांमधून काळ्या फिल्म काढण्यास सांगितले जाते.
3 / 9
यामध्ये पोलिसांनी अनेक प्रसिद्ध व्यक्तींनाही देखील दंड आकारला आहे. यावेळी त्यांचे काही फोटो देखील समोर आले आहेत.
4 / 9
दाक्षिणात्य सुपरस्टार्सना देखील दंड भरावा लागला आहे.
5 / 9
अल्लू अर्जुन: पुष्पा स्टार अल्लू अर्जुन (Pushpa Actor Allu Arjun) ला हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी गाडीला टिंटेड काच वापरल्याबद्दल दंड आकारला होता. ट्रॅफिक पोलिसांनी टिंटेड काचेच्या नियमांबद्दल अल्लू अर्जुनची कार थांबवली होती. यानंतर अभिनेत्यावर ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. पोलिसांनी त्याच ठिकाणी टिंटेड काचही हटवली होती.
6 / 9
अक्किनेनी नागा चैतन्य: अभिनेता अक्किनेनी नागा चैतन्य (Naga Chaitanya) याची गाडी देखील हैदराबाद ट्रॅफिक पोलिसांनी थांबवली होती. टिंटेड काचांमुळे पोलिसांनी त्याची गाडी थांबवली होती. अभिनेत्याने ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याने त्याला ७०० रुपयांचा दंड आकारण्यात आला होता. त्यानंतर त्याने त्याच्या टोयोटा वेलफायरच्या खिडक्यांवरील टिंटेड काचा हटवल्या होत्या.
7 / 9
ज्युनिअर एनटीआर: अभिनेता ज्युनिअर एनटीआर (RRR Star Jr NTR) देखील कायदेशीर अडचणीत सापडला होता. गाडीच्या काचांसाठी काळ्या फिल्मचा वापर केल्याबद्दल हैदराबाद पोलिसांनी त्यालाही दंड आकारण्यात आला होता. 'RRR' फेम अभिनेत्याने दंड भरला आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. रिपोर्ट्सनुसार टॉलिवूड अभिनेता त्यावेळी कारमध्येच होता. तो पोलिसांशी बोलला नाही पण त्याच्या ड्रायव्हरला चालान भरण्याचा सल्ला दिला. हैदराबादमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल अधिकाऱ्यांनी ७०० रुपयांचे चलन जारी केले आणि त्याच्या आलिशान कारमधून टिंटेड खिडकीचे शील्ड काढले होते.
8 / 9
त्रिविक्रम श्रीनिवास: चित्रपट निर्माते त्रिविक्रम श्रीनिवास देखील काही वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर अडचणीत सापडले होते. अलीकडेच हैद्राबाद पोलिसांनी 'अला वैकुंठापुरमुलू'च्या या दिग्दर्शकाला दंड ठोठावला होता. दिग्दर्शकाने लक्झरी कारच्या खिडक्यांना टिंटेड काच वापरली होती. यासाठी त्यांना 700 रुपये दंड भरावा लागला होता.
9 / 9
मंचू मनोज: अभिनेता मंचू मनोज याला देखील हैदराबाद वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पकडले होते. अभिनेत्याचे वाहन थांबवून त्याच्याकडून दंड वसूल करण्यात आला होता.
टॅग्स :सेलिब्रिटीबॉलिवूड