Join us
Daily Top 2Weekly Top 5

४ कोटींचे बजेट अन् ४० कोटींची कमाई! नेटफ्लिक्सवर नंबर १ वर ट्रेंड होतोय 'हा' रोमँटिक चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:37 IST

1 / 6
फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेल्या एका छोट्या तमिळ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालच केली आहे. केवळ ४ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जगभरात ३९ कोटींहून अधिक गल्ला जमवला. म्हणजेच आपल्या खर्चापेक्षा १० पट जास्त नफा या चित्रपटाने कमावला आहे.
2 / 6
थिएटरमध्ये प्रेक्षकांना भुरळ घातल्यानंतर आता हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. नेटफ्लिक्सवर (Netflix) रिलीज होताच या चित्रपटाने टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.
3 / 6
या सुपरहीट तमिळ रोमँटिक-कॉमेडी ड्रामा चित्रपटाचे नाव आहे 'विद लव' (With Love). ६ फेब्रुवारी २०२६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मदन यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
4 / 6
चित्रपटात अभिषाण जीविंत आणि अनस्वरा राजन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की, क्रिटिक्सनीही त्यांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले आहे.
5 / 6
ही गोष्ट आहे सत्या आणि मोनिषाची, जे शाळेत एकत्र होते. अनेक वर्षांनंतर एका 'ब्लाइंड डेट'वर त्यांची पुन्हा भेट होते. पण एका साध्या गेममुळे त्यांची प्रेमसंबंधात कशी गुंतागुंत निर्माण होते, हे या चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने मांडले आहे.
6 / 6
तरुण वयातील प्रेम, शाळा-कॉलेजच्या आठवणी आणि हलकी-फुलकी कॉमेडी यामुळे २ तास २० मिनिटांचा हा चित्रपट प्रेक्षकांचे पूर्ण मनोरंजन करतो. म्हणूनच IMDb वर या चित्रपटाला ७.७/१० असे उत्तम रेटिंग मिळाले आहे.
टॅग्स :सिनेमाTollywood