By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 11:12 IST
1 / 8दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सर्वांचं आवडतं कपल विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये लग्नबंधनात अडकले. 2 / 8अनेक वर्ष गुपचूप डेटिंग केल्यानंतर कपल म्हणून ते पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांना पाहून चाहते प्रचंड सुखावले. त्यांनी पती-पत्नी म्हणून पोस्ट केलेल्या लग्नाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला.3 / 8आता दोघांनी त्यांच्या संगीत नाईटचे ड्रीमी फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रश्मिका विजयच्या मिठीत आहे आणि दोघं आनंदाने डान्स करत आहेत.4 / 8सिल्व्हर रंगाच्या लेहेंग्यामध्ये रश्मिका अगदी परीच दिसत आहे. तर विजयने डार्क रंगाचा डिझायनर सूट आणि त्यावर सिल्व्हर कोट ओढला आहे.5 / 8या संगीत नाईटचे अनेक कँडीड फोटो त्यांनी पोस्ट केले आहेत. रश्मिका म्हणते, 'मी विजयला सरप्राईज दिलं. त्यानेही मला एक सरप्राईज दिलं आणि मग आमच्या कुटुंबियांनी आम्हाला सरप्राईज केलं. काय मस्त रात्र होती.'6 / 8'त्या रात्री कुटुंबीय आणि मित्रमंडळीच्यासोबत मी आणि विजय एक होऊन नाचलो. प्रेम, आनंदाश्रू, हास्यकल्लोळ, संगीत, गाणी, झगमगाट आणि आमचा मनसोक्त डान्सने युक्त अशी ती रात्र होती.'7 / 8कपलच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रेमाचा, लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांना अशा प्रकारे एकत्र पाहून चाहत्यांच्याही भावना अनावर झाल्या आहेत. 8 / 8विजय-रश्मिकाने लग्नानंतर चाहत्यांना एक गुडन्यूजही दिली. आगामी 'राणाबली' सिनेमात दोघंही एकत्र झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सिनेमाची पहिली झलकही समोर आली.