Join us
Daily Top 2Weekly Top 5

४२ वर्षीय साऊथ ब्युटीमुळे थलपति विजयचा मोडला संसार? अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय नाव, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 12:42 IST

1 / 10
साऊथ स्टार थलपति विजय त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. थलपति विजयची पत्नी संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
2 / 10
लग्नाच्या २७ वर्षांनी थलपति विजय आणि संगीता एकमेकांपासून वेगळे होणार आहेत. यामागे थलपति विजयचं एक्स्ट्रा मरेटियल अफेअर असल्याचं सांगण्यात येत आहे.
3 / 10
थलपति विजयचे अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. ही अभिनेत्री नक्की कोण आहे, याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
4 / 10
थलपति विजयचं नाव साऊथ ब्युटी तृषा क्रिष्णनसोबत जोडलं जात आहे. तृषाचे थलपति विजयसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
5 / 10
या फोटोंना तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एका फोटोला तिने 'वादळात शांतता आणि वादळाला शांतता...पुढे अनेक माइलस्टोन आहेत', असं कॅप्शन दिलं आहे.
6 / 10
तृषा कृष्णन ४२ वर्षांची असून थलपति विजयसोबत तिने अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे.
7 / 10
घिली, आथी, कुरुवी, थिरुपची या सिनेमांमध्ये ते एकत्र दिसले. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या लिओ सिनेमातही त्यांनी एकत्र काम केलं होतं.
8 / 10
एका इव्हेंटमध्ये विजयने तृषाला प्रिंसेस म्हटलं होतं. विजयच्या बर्थडेलाही तृषाने अनेकदा खास फोटो शेअर केल्याचं तिच्या अकाऊंटवर पाहायला मिळत आहे.
9 / 10
२०२१ मध्ये थलपति विजयच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती पडल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं आहे. अभिनेत्रीपासून सगळे संबंध तोडणार असल्याचं आश्वासन त्याने दिलं होतं. मात्र तरीही त्यांचं अफेअर सुरू होतं.
10 / 10
थलपति विजयने संगीतासोबत १९९९ मध्ये लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. २७ वर्षांनी ते घटस्फोट घेत असून संगीताने विजयकडे पोटगीची मागणी केली आहे.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीघटस्फोट