Join us
Daily Top 2Weekly Top 5

टोन्ड फिगर, लाजवाब सौंदर्य; ३१ वर्षांच्या 'या' साऊथ अभिनेत्रीने बॉलिवूड सुंदरींनाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 12:57 IST

1 / 8
भारतीय सिनेइंडस्ट्रीत अभिनेत्रींमध्ये सौंदर्य आणि लूक्सबाबतीत चढाओढ असते. अनेकदा अभिनेत्री बोटॉक्स, सर्जरी करुनही सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान साऊथ इंडस्ट्रीत अशी अभिनेत्री आहे जी बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रींना लूक्समध्ये मात देते.
2 / 8
या अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना घायाळ करतो. तिच्या प्रत्येक अदा आणि स्माईलवर चाहते फिदा आहेत. तिची टोन फिगर कातिलाना आहे. ही 'हसीना' नक्की आहे तरी कोण?
3 / 8
या अभिनेत्रीचं नाव आहे मालविका मोहनन (Malavika Mohanan). दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत ती लोकप्रिय आहे. स्लीम अँड ट्रीम फिगर, आकर्षक व्यक्तिमत्व आणि ग्लॅमरस लूकमुळे ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
4 / 8
फक्त सौंदर्य आणि लूकच नाही तर मालविका तिच्या दमदार अभिनयासाठीही ओळखली जाते. मालविका ३१ वर्षांची असून तिचा जन्म केरळमध्ये झाला. तर मुंबईत ती लहानाची मोठी झाली.
5 / 8
2013 साली मालविकाने 'पट्टाम पोल' या मल्याळम सिनेमातून पदार्पण केलं. तर 2017 साली माजिद मजिदी यांच्या 'बियॉन्ड द क्लाऊड्स' या हिंदी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
6 / 8
बियॉन्ड द क्लाऊड्समध्ये तिने ईशान खट्टरच्या बहिणीची भूमिका केली होती. यातील जेलमधल्या सीनसाठी तिने १५ दिवसात 8 किलो वजन कमी केलं होतं. तसंच तिने बरेच दिवस आपले केसही धुतले नाही जेणेकरुन तसा लूक मिळेल. माजिदी यांनी मालविकाची मेहनत पाहून दीपिका आणि कंगनाचा पत्ता कट करत तिला घेतलं होतं.
7 / 8
मालविका आगामी 'थंगलान' या तमिळ सिनेमात दिसणार आहे. हा चियान विक्रमचा सिनेमा आहे. यामध्ये मालविकाने जादुगरनीची भूमिका केली आहे. या सिनेमावेळीही मालविकाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हेवी मेकअपमुळे तिच्या चेहऱ्यावर बर्नमार्क्स आले होते. १५ ऑगस्टला सिनेमा रिलीज होतोय.
8 / 8
मालविका सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.इन्स्टाग्रामवर तिचे 4 मिलियन फॉलोअर्स आहेत. एकापेक्षा एक सुंदर फोटो तिने पोस्ट केले आहेत.
टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटीसोशल मीडिया