Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजयसोबत लग्नाआधी 'ब्राइड टू बी' रश्मिकाची बॅचलर पार्टी? झक्कास PHOTOS आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:13 IST

1 / 10
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा. या दोघांची ऑनस्क्रिन जोडी तर प्रेक्षकांना आवडतेच, पण त्यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीही प्रेक्षकांची आवडती आहे. आता हे दोघे खऱ्या आयुष्यतही एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार होणार आहेत.
2 / 10
रश्मिका आणि विजय येत्या फेब्रुवारीत लग्न करणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच विजय-रश्मिका यांनी गुपचूप साखरपुडाही केला, तेव्हापासून दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे.
3 / 10
अशातच विजयसोबत बोहल्यावर चढण्याआधी रश्मिकानं बॅचलरेट पार्टी केल्याची चर्चा आहे. तिने नुकतंच सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो पाहून चाहत्यांनी हा अंदाज बांधला आहे.
4 / 10
रश्मिका मंदाना सध्या तिच्या 'गर्ल गँग'सोबत श्रीलंका ट्रिपवर गेली आहे. ज्याचे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
5 / 10
रश्मिकाने आपल्या मैत्रिणींसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिनं लिहलं, 'मी नुकतीच दोन दिवसांची सुट्टी घेतली आणि माझ्या मुलींसोबत प्रवास करायला मिळाला. आम्ही श्रीलंकेतील एका सुंदर ठिकाणी गेलो. मुलींच्या सहली, कितीही लहान असल्या तरी, सर्वोत्तम असतात! माझ्या मैत्रिणी बेस्ट आहेत!'
6 / 10
रश्मिकाच्या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युझरने विचारले, 'मॅडम, ही तुमची बॅचलरेट पार्टी आहे का?' तर काहींनी तिचे लग्न विजय देवरकोंडाशीच होणार असल्याचे गृहीत धरून तिला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.
7 / 10
विजय आणि रश्मिका या दोघांनी अद्याप लग्नावर अधिकृत शिक्कामोर्तब केले नसले तरी, त्यांचे प्रेम आता लपून राहिलेले नाही.
8 / 10
रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांची जोडी चाहत्यांची लाडकी आहे. 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड' मधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.
9 / 10
रश्मिका मंदाना आणि विजय यांची लव्हस्टोरी 'गीता गोविंदम'च्या शूटवेळी सुरु झाली. याआधी रश्मिकाने २०१७ सालीच अभिनेता रक्षित शेट्टीसोबत साखरपुडा केला होता. मात्र एका वर्षातच त्यांचं नातं तुटलं
10 / 10
रश्मिका आणि विजय हे येत्या २६ फेब्रुवारीला लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. उदयपूरमध्ये एका ग्रँड पॅलेसमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चाहतेही रश्मिका-विजयच्या लग्नासाठी आतुर आहेत.
टॅग्स :रश्मिका मंदानाविजय देवरकोंडालग्न