एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही राम चरणचं घर, फोटो पाहिलेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 18:10 IST
1 / 10सुपरस्टार रामचरण तेजा (Ramcharan Teja) याने उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर संपूर्ण जगभरात लोकप्रियता मिळवली आहे.2 / 10अभिनय आणि लोकप्रियतेबरोबरच, त्याची लाइफस्टाइलही चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरते.3 / 10रामचरण तेजा हैदराबादमधील कोनिडेला हाऊसमध्ये राहतो. त्याचा हा बंगला पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही.येथे राम चरण त्याच्या पत्नी, मुले आणि कुटुंबातील इतर सदस्यांसह राहतो.4 / 10अलिकडेच कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याची पत्नी उपासना कोनिडेला हिने त्यांच्या आलिशान घराचा प्रत्येक कोपरा दाखवला.5 / 10हे घर केवळ आकाराने भव्य नसून, त्याच्या डिझाइनमध्ये अँटीक टच आणि आधुनिक इंटीरियरचा अनोखा संगम पाहायला मिळतो.6 / 10आरामदायी फर्निचरमुळे घरात बसूनही बाहेरील दृश्यांचा आनंद घेता येतो.7 / 10घराभोवती झाडे आणि वनस्पतींनी वेढलेली हिरवळ आहे, जी संपूर्ण परिसराला नैसर्गिक सौंदर्य देते. 8 / 10 राम चरणची पत्नी उपासना ही एक यशस्वी व्यावसायिक आहे. ती अपोलो हॉस्पिटल्स समूहाचा एक भाग आहे.9 / 10राम चरणचे कुटुंब टॉलिवूडमधील सर्वात प्रिय कुटुंबांपैकी एक आहे.10 / 10राम चरण याचे फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्येच नाही तर उद्योजक जगतातही मोठं नाव आहे. तो तब्बल १३७० कोटींचा मालक आहे.