By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:07 IST
1 / 10अभिनेत्री आणि मॉडेल संयुक्ता आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अनिरुद्ध श्रीकांत यांनी गुरुवारी चेन्नईमध्ये लग्नगाठ बांधली आहे. 2 / 10 गेल्या काही आठवड्यांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या. संयुक्ता आणि अनिरुद्ध श्रीकांत यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर येताच लगेच व्हायरल झाले.3 / 10संयुक्ता आणि अनिरुद्ध यांचा पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने लग्न समारंभ पार पाडला. या सोहळ्याला फक्त कुटुंबातील सदस्य, जवळचे नातेवाईक आणि अगदी मोजके मित्र उपस्थित होते.4 / 10लग्नासाठी अनिरुद्धनं त्यांचा लूक अत्यंत साधा पण 'क्लासिक' ठेवला होता. सोनेरी रंगाचा पारंपरिक शर्ट आणि वेष्टीमध्ये तो अत्यंत राजबिंडा दिसत होता. 5 / 10 संयुक्ताने या खास दिवशी सुंदर सोनेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. संयुक्ता या साडीत अधिकच देखणी दिसत होती. 6 / 10चित्रपटसृष्टी, क्रिकेट जगतातून या जोडप्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.7 / 10दिवाळीच्या सुमारास दोघांचा एकत्र असलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती.8 / 10संयुक्ता आणि अनिरुद्ध श्रीकांत या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. संयुक्ताचे पहिले लग्न टेक उद्योजक कार्तिक शंकर यांच्याशी झाले होते. २०१५ च्या सुरुवातीला त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा देखील आहे.9 / 10अनिरुद्धचे यापूर्वी मॉडेल आरती वेंकटेशशी लग्न झाले होते, जे दोन वर्ष टिकले. त्यांनी २०१४ मध्ये घटस्फोट घेत नातं संपवलं. अनिरुद्ध श्रीकांत हा माजी भारतीय क्रिकेटपटू कृष्णमाचारी श्रीकांत यांचा मुलगा आहे. 10 / 10संयुक्ता ही काही काळ मॉडेलिंग इंडस्ट्रीत कार्यरत होती. तिने २००७ मध्ये 'मिस चेन्नई'चा किताब जिंकला होता. पण, 'बिग बॉस'मुळे तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. 'बिग बॉस तमिळ'च्या सीझन ४ मध्ये संयुक्ता दिसली होती. त्यानंतर संयुक्ताने विजयच्या 'वारिसु' सिनेमातही काम केलं.