Join us

फहाद फासिलच्या 'मारेसन' सिनेमाची इतकी चर्चा का? शेवटच्या ४० मिनिटात डोकं चक्रावणारा खेळ

By देवेंद्र जाधव | Updated: August 29, 2025 16:27 IST

1 / 7
सध्या मनोरंजन विश्वात एका सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. हा सिनेमा म्हणजे फहाद फासिलचा 'मारेसन'. हा सिनेमा ज्यांनी ज्यांनी पाहिलाय त्यांना आवडतोय
2 / 7
मल्याळम सिनेमा कंटेंटच्या बाबतीत का पुढे आहे हे हा सिनेमा पाहून आपल्याला पुन्हा समजतं. 'मारेसन' सिनेमा सुरुवातीला एकदम हलकाफुलका असतो. पण शेवटच्या ४० मिनिटात सिनेमाचं कथानक असं काही फिरतं, की आपलं डोकं चक्रावून जातं
3 / 7
'मारेसन' सिनेमाची कथा नुकत्याच तुरुंगातून सुटलेला चोर धाया आणि अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त असलेल्या म्हातारा व्यक्ती पिल्लाई या दोघांवर आधारीत आहे. चोर असलेला धया हा पिल्लाईच्या घरी चोरी करायला जातो.
4 / 7
पण नंतर त्याला कळतं की पिल्लाई हा अल्झायमरच्या आजाराने ग्रस्त आहे. याशिवाय त्याच्या अकाऊंटमध्ये ५ लाख रुपये आहेत, असं धयाला कळतं. त्यामुळे म्हाताऱ्या माणसाला गाडीवरुन फिरवून योग्य वेळी त्याच्या ATM मधून पैसे चोरण्याची कल्पना धया आखतो.
5 / 7
सिनेमा जेव्हा इंटरव्हलपर्यंत पोहोचतो तेव्हा एका मोठ्या आमदाराचा खून झाला असतो. त्यामुळे 'मारेसन'मध्ये मोठा ट्विस्ट निर्माण होतो.
6 / 7
'मारेसन' सिनेमाच्या शेवटच्या ४० मिनिटात चोर असलेला धयाची खरी बाजू कळते. इतकंच नव्हे धया ज्या व्यक्तीला अल्झायमरने ग्रस्त असलेला म्हातारा समजत होता, त्याचीही खरी कहाणी उलगडते.
7 / 7
'मारेसन' सिनेमाला IMDB वर ७.५ रेटिंग आहे. सिनेमात फहाद फासिलने धया ही चोराची भूमिका साकारली असून ज्येष्ठ अभिनेते वदिवेलू यांनी पिल्लाईची भूमिका साकारली आहे
टॅग्स :Tollywoodबॉलिवूडमराठीमराठी अभिनेता