By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 12:19 IST
1 / 11साऊथ सुपरस्टार सामंथा रूथ प्रभु सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. गतवर्षी नागा चैतन्यसोबत झालेल्या घटस्फोटानंतर सामंथा अचानक चर्चेत आली होती.2 / 11सामंथा व नागा पुन्हा एकदा सगळं विसरून एकत्र येतील, अशी आशा चाहत्यांना अजूनही आहे. पण सामंथा मात्र तडजोड करण्याच्या मूडमध्ये अजिबात नाही. तिचं ताजं वक्तव्य पाहून तरी हेच वाटतं.3 / 11अलीकडे इन्स्टावर ‘आस्क मी एनिथिंग’सेशनमध्ये ती जे काही बोलली, ते वाचून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 4 / 11 ‘आस्क मी एनिथिंग’मध्ये चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले होते. एका प्रश्न होता टॅटूशी संबंधित. आणखी नवा टॅटू काढण्याचा काही प्लान आहे का? असा प्रश्न एका चाहत्याने तिला केला.5 / 11यावर सामंथाने जे काही उत्तर दिलं ते वाचून सगळेच अवाक् झालेत. मी माझ्यापेक्षा लहान असलेल्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते की, कधीही कोणताही टॅटू काढू नका. कधीच...कधीच नाही..., असं उत्तर तिने दिलं.6 / 11सामंथा असं का म्हणाली तर कदाचित आता तिला टॅटू काढल्याचा पश्चाताप होतोय. कारण नागा चैतन्यसाठी तिने तिच्या शरीरावर 3 टॅटू बनवले होते.7 / 11सामंथाच्या शरीरावर तीन टॅटू आहेत. यातील एक टॅटू तिच्या पाठीवर आहे, ज्यामध्ये YMC ‘ये माया चेसावे’ असं लिहिले आहे. हे तिच्या पहिल्या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपट 2010 मध्ये रिलीज झाला होता, ज्यामध्ये तिचा एक्स हसबण्ड नागा चैतन्य मुख्य भूमिकेत होता.8 / 11 सामंथाचा आणखी एक टॅटू तिच्या बरगडीवर आहे, ज्यामध्ये ... लिहिले आहे. हे नागा चैतन्यचं टोपणनाव आहे. 9 / 11तिने तिसरा टॅटू सरळ मनगटावर कोरलेला आहे, ज्यामध्ये बाणाचे चिन्ह बनवलं आहे. नागा चैतन्यनेही उजव्या हाताच्या मनगटावर असाच टॅटू काढला आहे. 10 / 11नागासोबत वेगळं झाल्यानंतर सामंथाला कदाचित टॅटू काढल्याचा पश्चाताप होत असावा. तूर्तास तरी तिच्या उत्तरावरून हेच वाटतंय.11 / 11सामंथा आणि नागा यांनी लग्नाच्या चार वषार्नंतर गेल्या वर्षी घटस्फोट घेतला. दोघांनी घटस्फोटाची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. या दोघांनी 2017 मध्ये गोव्यात थाटामाटात लग्न केलं होतं.