"अभिनेते म्हणतात मी मोठी दिसते...", सोनाक्षी सिन्हाने व्यक्त केला राग; म्हणाली, 'अशा हिरोंसोबत..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 14:42 IST
1 / 7'दबंग' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha). सोनाक्षीला इंडस्ट्रीत १४ वर्ष झाली आहेत. मात्र अजूनही तिला म्हणावं तसं आपलं स्थान निर्माण करता आलेलं नाही.2 / 7सोनाक्षी बॅक टू बॅक सिनेमांमध्ये दिसत नाही याला अनेक कारणं आहेत. ती तिच्या वयापेक्षा मोठी दिसते अशी नेहमीच चर्चा होते. अनेक अभिनेते मग ते तिच्यापेक्षा मोठे का असेना तिच्यासोबत स्क्रीन शेअर करायला नकार देतात असा खुलासा सोनाक्षीनेच केला आहे.3 / 7झूमला दिलेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाने आपला राग व्यक्त केला. ती म्हणाली, 'इंडस्ट्रीत अभिनेत्यांना कधीच त्यांचं वय दाखवलं जात नाही. त्यांना यामुळे अडचण येत नाही. पण अभिनेत्रींवर नेहमीच हा दबाव असतो. 4 / 7पडद्यावर हिरो ३० वर्ष छोट्या अभिनेत्रीसोबतही रोमान्स करतो. तेव्हा त्याला वयावरुन, बॉडी टाइपवरुन काहीच बोललं जात नाही. महिलांना मात्र टाईपकास्ट केलं जातं. हा फरक अगदी स्पष्ट दिसून येतो.'5 / 7मी स्वत: अशा अभिनेत्यांना भेटले आहे जे माझ्याहून वयाने मोठे आहेत. पण मी त्यांच्याहून मोठी दिसते असं सांगत त्यांनी नकार दिला आहे. मी त्यांचे आभारच मानेन कारण मलाही अशा विचारांच्या अभिनेत्यांसोबत काम करण्याची इच्छा नाही.'अशा अभिनेत्यांसाठी सोनाक्षी गंमतीत म्हणते,'अरे मी तुझ्याहून ५-६ वर्षांनी लहान आहे.'6 / 7नेहमीच महिलांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्यांनाच अशा अडचणींमधून वाट काढावी लागते. आपण सगळेच कलाकार आहोत पण अभिनेत्रींसाठीच या गोष्टी इतक्या कठीण का आहेत?7 / 7सोनाक्षीने 'दबंग' नंतर 'राऊडी राठोड','आर राजकुमार','सन ऑफ सरदार','लुटेरा','कलंक' अशा अनेक सिनेमांमध्ये काम केलं. ती शेवटची 'हीरामंडी' सीरिजमध्ये दिसली. आता ती आगामी 'निकिता रॉय एंड द बुक ऑफ डार्कनेस' मध्ये दिसणार आहे.