PICS : नागा चैतन्य हिच्या प्रेमात? एक्स-वाईफ सामंथाइतकीच सुंदर आहे शोभिता धुलिपाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:39 IST
1 / 10साऊथची लोकप्रिय अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य प्रचंड चर्चेत आला होता. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.2 / 10रिपोर्टनुसार, सामंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य पुन्हा प्रेमात पडला आहे. ‘मेड इन हेवन’ फेम अभिनेत्री शोभिता धुलिपालाला तो डेट करत असल्याची चर्चा आहे.3 / 10गेल्या काही दिवसांपासून नागा चैतन्य व शोभ धुलिपाला सर्रास एकत्र दिसत आहेत. नागाने अलीकडे हैदराबादेत घर घेतलं, तेथे सध्या काम सुरू आहे. नागा व शोभिता अनेकदा या घराच्या फेरफटका मारताना दिसले.4 / 10अलीकडे मेजर या सिनेमाच्या प्रमोशनसाठी शोभिता ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्या हॉटेलमध्ये नागा चैतन्य अनेकदा दिसला. यावरून दोघांच्या अफेअरच्या चर्चांना बळ मिळालं आहे.5 / 10आता ही शोभिता कोण तर ती एक लोकप्रिय मॉडेल व अभिनेत्री आहे. मेड इन हेवन या सुपरहिट वेब शोमध्ये ती दिसली होती. अलीकडे महेशबाबूच्या मेजर या चित्रपटात ती दिसली होती.6 / 10शोभिता नागा चैतन्यची एक्स वाईफ सामंथा रूथ प्रभुपेक्षा सौंदर्यात कमी नाही. 2013 मध्ये तिने फेमिना मिस इंडिया खिताब जिंकला होता.7 / 10शोभिता तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. बोल्डेनेसच्या बाबतीत ती कुणापेक्षाही कमी नाही.8 / 10शोभिता हिंदी, मल्याळम, तेलगू चित्रपटात काम करते. सोशल मीडियावर ती सतत स्वत:चे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.9 / 10शोभिताने अनुराग कश्यपच्या ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. कालकांडी आणि शेफ या सिनेमातही ती दिसली.10 / 10नागा आणि सामंथा यांनी 2017 मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली होती.