Join us  

'हा' प्रसिद्ध दिग्दर्शक आहे स्नेहलता वसईकरचा नवरा; 'ठरलं तर मग' मालिकेचं केलंय दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 5:19 PM

1 / 9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे स्नेहलता वसईकर.
2 / 9
आजवरच्या कारकिर्दीत स्नेहलताने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
3 / 9
कधी ऐतिहासिक तर कधी ग्रे शेडची भूमिका साकारुन तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये कायम तिची चर्चा रंगते.
4 / 9
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेमध्ये स्नेहलताने सोयराबाईंची भूमिका साकारुन प्रचंड लोकप्रियता मिळवली.
5 / 9
नाटक, मालिका, चित्रपट आणि वेबसीरिज या माध्यमातून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यामुळे तिच्या फिल्मी करिअरविषय़ी सगळ्यांनाच ठावूक आहे.
6 / 9
सध्या सोशल मीडियावर स्नेहलताच्या नवऱ्याची चर्चा होतीये. तिचा नवरा सुद्धा कलाविश्वाशी निगडीत आहे.
7 / 9
गिरीश वसईकर असं तिच्या नवऱ्याचं नाव असून तो मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक आहे.
8 / 9
प्रेमाची गोष्ट या मालिकेचं दिग्दर्शन गिरीश करत आहे. यापूर्वी त्याने ठरलं तर मग या मालिकेचंही दिग्दर्शन केलं आहे.
9 / 9
सध्या स्नेहलता सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेत काम करत आहे. तसंच शिवपुत्र संभाजी या गाजलेल्या महानाट्यातही ती काम करताना दिसत आहे.
टॅग्स :स्नेहलता वसईकरसेलिब्रिटीटिव्ही कलाकार