४४ वर्षांची झाली 'संतूर मॉम'! 'बिग बॉस' विजेती ते पाकिस्तानी सिनेमात काम; श्वेता तिवारीच्या रंजक गोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 15:53 IST
1 / 7'संतूर मॉम' नावानेच ओळखली जाणारी श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आज ४४ वर्षांची झाली आहे. याही वयात तिचा कमालीचा फिटनेस आणि सौंदर्य घायाळ करणारं आहे. 2 / 7श्वेताला लहानपणापासूनच अभिनयात गोडी होती. आधी तिने थिएटरमध्येही काम केलं. नंतर बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये ती झळकली. 'कसौटी जिंदगी की' मधील प्रेरणा नावाने तर तिला लोकप्रियता मिळवून दिली. 3 / 7२०११ साली श्वेता बिग बॉस सीझन ४ ची विजेती ठरली होती. बिग बॉसची ट्रॉफी जिंकणारी ती पहिली महिला ठरली. द ग्रेट खली तेव्हा रनर अप राहिला होता.4 / 7श्वेताने पाकिस्तानी सिनेमातही काम केलं आहे हे खूप कमी जणांना माहित असेल. २०१४ साली आलेल्या 'सल्तनत' या पाकिस्तानी सिनेमात ती अभिनेता एहसान खानसोबत झळकली. याचं शूटिंग दुबईत झालं होतं. 5 / 7रिलेशनशिपबाबतीत श्वेता अनलकीच ठरली. दोन लग्नात तिला अपयश आलं. यामुळे तिला आजही यावरुन जज केलं जातं. १९९८ साली भोजपुरी अभिनेता राजा चौधरीसोबत तिचं पहिलं लग्न झालं होतं. तर २०१३ साली अभिनव कोहलीसोबत तिचं दुसरं लग्न झालं. दोघांवरही तिने हिंसाचाराचा आरोप लावला होता. 6 / 7श्वेताला पहिल्या पतीपासून २२ वर्षांची मुलगी आहे. तर दुसऱ्या पतीपासून ८ वर्षांचा मुलगा आहे. दोन लग्न, घटस्फोट आणि सिंगल मदर यामुळे ती कायम चर्चेत असतेच. 7 / 7श्वेता तिच्या फिटनेसमुळे अनेक महिलांना प्रेरणा देते. तिच्या सौंदर्याची स्तुती करावी तितकी कमी आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोंचा धुमाकळू असतो. म्हणूनच तिला 'संतूर मॉम' हे परफेक्ट टॅग मिळालं आहे.