Join us

Shweta Tiwari : “तू दोन लग्न केलीस, तुझी लेक....”, लग्नावरून डिवचणाऱ्यांना श्वेता तिवारीचं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 11:28 IST

1 / 10
अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari ) हे टेलिव्हिजनचं मोठ नाव आहे. कसौटी जिंदगी की या मालिकेतील तिने साकारलेली प्रेरणाची भूमिका आजही प्रेक्षक विसरलेले नाहीत.
2 / 10
परवरिश, बेगुसराय, मेरे डॅड की दुल्हन अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली. बिग बॉसचं विजेतेपदही तिने पटकावलं. नच बलिए, झलक दिखला जा, खतरों के खिलाडी अशा अनेक रिॲलिटी शोमध्ये झळकली.
3 / 10
प्रोफेशनल लाईफमध्ये श्वेता तिवारी प्रचंड यशस्वी झाली. पण पर्सनल लाईफमध्ये तिने अनेक चढऊतार पाहिलेत.श्वेतानं एक नाही तर दोन लग्नं केलीत. मात्र दोन्ही लग्नं फार काळ टिकली नाहीत. काही वर्षांपूर्वी दुसरा पती अभिनव कोहलीपासूनही ती वेगळी झाली.
4 / 10
अलीकडे बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत श्वेता आपल्या अयशस्वी वैवाहिक आयुष्याबद्दल बोलली. तिसरं लग्न न करण्याचा सल्ला देणाऱ्या लोकांना तिने यावेळी सणसणीत उत्तर दिलं.
5 / 10
ती म्हणाली, तुम्ही १० वर्षे लिव्हइनमध्ये असाल आणि नंतर त्यातून बाहेर पडले असाल तरी तुम्हाला कोणी काहीही विचारत नाही. पण लग्न दोन वर्षांत मोडलं तरी लोक नको ते बोलायला लागतात.
6 / 10
पुढे ती म्हणाली, तिसरं लग्न चुकूनही करू नकोस, असं लोक मला म्हणतात. काय मी तुम्हाला तुमचा सल्ला विचारला? मला सल्ला देणारे तुम्ही कोण? माझ्या लग्नाचा खर्च तुम्ही करणार आहात का? हा माझा निर्णय आहे आणि हे माझं आयुष्य आहे.
7 / 10
माझ्या अयशस्वी लग्नावरून सोशल मीडियावर मला वाईट पद्धतीने ट्रोल केलं जातं. हिने दोन लग्न केलीत, हिची मुलगी पाच लग्नं करेल, असं काय काय बोलतात. पण कदाचित माझी मुलगी लग्नच करणार नाही. तिने जे काही बघितलं आहे, ते पाहून ती कदाचित असा विचार करेल..., असं ती म्हणाली.
8 / 10
ती म्हणाली, मी घटस्फोट घेतला तर मुलांचं काय होईल, अशी चिंता माझ्या कुटुंबीयांना होती. पण मी माझा निर्णय घेतला. मुलं आपल्या आईवडिलांना रोज भांडतांना पाहत असतील, रोज बापाला नशेत बघत असतील तर त्यापेक्षा सिंगल पॅरेंट बनून त्यांना वाढवणं अधिक योग्य आहे.
9 / 10
श्वेताने वयाच्या केवळ 18 व्या वर्षी राजा चौधरीसोबत लग्न केलं होतं. पण राजाच्या छळाला कंटाळून तिने त्याला घटस्फोट दिला. राजापासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. यानंतर अभिनव कोहलीसोबत तिने दुसरा संसार थाटला.
10 / 10
हे दुसरं लग्नही फार काळ टिकू शकलं नाही. 2019 मध्ये श्वेता पती अभिनव कोहलीलापासून वेगळी झाली. दुसरा संसार मोडल्यावर श्वेताला अनेक संकटांना सामोरं जावं लागलं. श्वेता आणि अभिनवला रेयांश नावाचा मुलगा आहे.
टॅग्स :श्वेता तिवारीसेलिब्रिटीटेलिव्हिजन