Join us

चर्चेत आहे 'बंदिश बँडिट्स' गर्ल श्रेया चौधरी, नसीरुद्दीन शाह यांनी कौतुक करताच भारावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:56 IST

1 / 10
बहुचर्चित अ‍ॅमेझॉन प्राईमवरील 'बंदिश बँडिट्स' या वेबसीरिजचा दुसरा सीझन खूप चर्चेत आहे. यातील मुख्य अभिनेत्री श्रेया चौधरी हिने तर साऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
2 / 10
केवळ प्रेक्षक आणि शोच्या चाहत्यांकडूनच नाही तर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्याकडूनही तिच्या अभिनयाचं कौतुक होत आहे.
3 / 10
'बंदिश बँडिट्स' ही राधे व तमन्‍नाची कथा आहे. श्रेयानं तमन्ना या व्यक्तिरेखा साकारली असून प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवला आहे.
4 / 10
पहिल्या सीझनमध्ये दिग्‍गज अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी पंडितजींची भूमिका साकारली होती. परंतु खूप कमी जणांना माहिती आहे की नसीरुद्दीन शाह यांना श्रेया मोठा आदर्श मानते.
5 / 10
नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबरच्या नात्याविषयी बोलताना श्रेया चौधरी म्हणाली, 'नसीरुद्दीन सर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे प्रेरणास्थान आहेत. मी पहिल्या सीझनमध्ये त्यांच्याकडून खूप काही शिकले आणि मला त्यांना जवळून पाहण्याची व त्यांच्यासोबत वर्कशॉप करण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे. जेव्हा सरांनी दुसरा सीझन पाहिल्यानंतर मला मेसेज पाठवला, तेव्हा मला तो सर्वोच्च सन्मान वाटला. त्यांच्या प्रतिक्रिया आणि कौतुक हे माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. हे खूप समाधानकारक आणि आश्वासक आहे आणि मला वाटतं की अभिनेत्री म्हणून मी प्रगती करतेय'.
6 / 10
श्रेया चौधरी लवकरच 'द मेहता बॉयज' मध्ये अविनाश तिवारीसोबत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन बोमन इराणी करणार आहेत. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
7 / 10
6 नोव्हेंबर 1995 रोजी कोलकाता येथे जन्मलेली श्रेया मुंबईतच मोठी झाली आहे. तिनं आपलं शालेय शिक्षण मुंबईच्या जानकीदेवी पब्लिक स्कूलमधून केलं. त्यानंतर मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेजमधून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. जेव्हा ती कॉलेजमध्ये होती तेव्हा तिने एका टीव्ही जाहिरातीसाठी ऑडिशन दिलं होतं. आतापर्यंत अनेक प्रसिद्ध भारतीय मासिकांच्या कव्हर पेजवरही ती दिसली आहे.
8 / 10
श्रेयाने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मनीषा कोईरालासोबत 'डियर माया' या चित्रपटात केली होती. याशिवाय ती 'द अदर वे' (2018) आणि 'कंडिशन्स अप्लाय' (2023) यामध्येही दिसली आहे. तिने अनेक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलं आहे.
9 / 10
श्रेयाच्या लव्हलाईफबद्दल बोलायचं झालं तर तिचं नाव टीव्ही अभिनेता करण टॅकरसोबत जोडलं गेलं आहे. रिपोर्ट्सनुसार, ती करण टॅकरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
10 / 10
श्रेया ही हिंदू राजपूत कुटुंबात वाढली असून तिच्या वडिलांचे नाव रोहित चौधरी आणि आईचे नाव कांचन चौधरी आहे. तिला एक मोठा भाऊ करण चौधरी देखील आहे, ज्याचे लग्न श्रुती भगतानीशी झालं आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीवेबसीरिजबॉलिवूडनसिरुद्दीन शाह