Join us

Photos: कुंजवनाची सुंदरराणी रुप तुझे...! गर्द झाडीत श्रेया बुगडेचं फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 17:10 IST

1 / 7
'चला हवा येऊ द्या' मुळे प्रसिद्धीझोतात आलेली सर्वांची लाडकी श्रेया बुगडे (Shreya Bugde). श्रेया कमालीची मिमिक्री करते हे सर्वांनीच पाहिलं. चाहते आणि सेलिब्रिटींनीही तिच्या कामाची प्रशंसा केली.
2 / 7
श्रेया खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. तिला वेगवेगळ्या फॅशन करायला आवडतात. नवऱ्यासोबत फिरतानाचेही तिचे फोटो नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
3 / 7
नुकतंच श्रेयाने केलेलं हे फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बेबी पिंक वनपीसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. हातात स्टायलिश पर्स, डोळ्यावर गॉगल या कूल लूकमध्ये तिने फोटो पोस्ट केलेत.
4 / 7
एका रेस्टॉरंटमध्ये तिने हे फोटोशूट केलंय असं दिसतंय. डायनिंग टेबलच्या आजूबाजूलाच हा सुंदर परिसर आहे. तिथे श्रेया पोज देत आहे.
5 / 7
श्रेयाची स्टाईल पाहून प्रेक्षकही फिदा झालेत. 'माझं हृदय हे आता माझं राहिलेलंच नाही. कारण त्यात फक्त तूच आहेस.' असं रोमँटिक कॅप्शन तिने दिलं आहे.
6 / 7
१० वर्ष मनोरंजन केल्यानंतर 'चला हवा येऊ द्या'ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. कुशल बद्रिके हिंदी शोमध्ये गेला. निलेश साबळे, भाऊ कदम यांनी वेगळा शो सुरु केला. तर भारत गणेशपुरे मालिकेत आले. पण या सगळ्यात श्रेया काय करतेय असा प्रश्न सर्वांनाच पडला.
7 / 7
तर श्रेयाचा 'बिग एफएम' वर नवा शो सुरु झाला आहे. 'बिग हा हा हा कार' असं याचं नाव आहे. टेलिव्हिजनवरुन श्रेयाने रेडिओत पदार्पण केलंय.
टॅग्स :श्रेया बुगडेटेलिव्हिजनमराठी अभिनेताव्हायरल फोटोज्सोशल मीडिया