स्टारकिड असूनही कॉफी शॉपमध्ये काम करायची 'ही' अभिनेत्री, आज गाजवतेय हिंदी सिनेइंडस्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 15:18 IST
1 / 9सिनेइंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी अनेक जण संघर्ष करुन येतात. अनेक ऑडिशन्स देतात तर कोणी पार्टटाइम नोकरी करतही सिनेमांमध्ये येण्याचं स्वप्न पाहतात.2 / 9मात्र अशी एक अभिनेत्री आहे जी स्टारकीड असूनही चक्क कॉफी शॉपमध्ये काम करायची. महिन्याच्या खर्चासाठी तिला हे काम करावं लागायचं.3 / 9ती आज बॉलिवूडमधली 'खूबसूरत' अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तसंच 'ब्लॉकबस्टर स्त्री' अशीही तिची आता नव्याने ओळख आहे.4 / 9 तर श्रद्धा काही वर्ष बोस्टनमध्ये शिक्षणासाठी होती. तिथे ती महिन्याच्या खर्चासाठी कॉफी शॉपमध्ये वेटर म्हणून काम करायची.5 / 9ही आहे अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor). आता तुम्ही म्हणाल शक्ती कपूरची लेक असलेल्या श्रद्धाला कॉफी शॉपमध्ये काम करायची गरज काय?6 / 9परदेशात अनेक जण पार्टटाइम नोकरी म्हणून रेस्टॉरंट, कॅफेमध्ये काम करतात. अगदी अक्षय कुमारनेही वेटरचं काम केलं आहे.7 / 9काही वर्षांनी भारतात आल्यावर श्रद्धाने 'तीन पत्ती'मधून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. नंतर आलेल्या 'आशिकी २' मुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. 8 / 9आज श्रद्धा ब्लॉकबस्टर स्त्री आहे. 'स्त्री २'हा ब्लॉकबस्टर हिट देऊन तिची गणना आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये होत आहे.9 / 9तसंच श्रद्धाचे सोशल मीडियावर सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामवर ९४.२ मिलियन लोक तिला फॉलो करतात. विराट कोहली फॉलोअर्समध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.