By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 12:11 IST
1 / 9कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि स्टारडममुळे चर्चेत येत असतात. यात खासकरुन त्यांच्याकडे होणाऱ्या पार्टीज् तर कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. परंतु, या बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी आहेत जे पार्टीत तर सहभागी होतात. मात्र, मद्यपान आणि धुम्रपानापासून कोसो दूर आहेत. त्यामुळे ड्रिंक न करणारे कलाकार कोणते ते पाहुयात.2 / 9शिल्पा शेट्टी - बॉलिवूडची योगागर्ल शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसकडे कायमच लक्ष देते. अलिकडेच तिने नॉन व्हेज खाणं सोडून दिल्याचं म्हटलं जातं. तसंच शिल्पा मद्यपान व धुम्रपानही करत नाही.3 / 9अमिताभ बच्चन - बिग बीदेखील त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतात. त्यामुळे ते कधीच मद्यपान करत नाहीत.4 / 9जॉन अब्राहम - अभिनयासोबतच फिटनेसमुळे कायम चर्चेत येणारा अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम. बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी जॉन न चुकता वर्कआऊट करतो. विशेष म्हणजे यासाठी तो ड्रिंक्स आणि स्मोकिंगदेखील टाळतो.5 / 9अक्षय कुमार - बॉलिवूडमधील सर्वात फिट अभिनेता म्हणून अक्षयकडे पाहिलं जातं. हा खिलाडीकुमार खऱ्या आयुष्यात प्रचंड वक्तशीरपणे वागतो. ७ पर्यंत तो रात्रीचं जेवण घेतो आणि पहाटे लवकर उठून वर्कआऊटला सुरुवात करतो. इतकंच नाही तर अक्षय मद्यपानदेखील करत नाही.6 / 9परिणीती चोप्रा - अभिनयासोबतच आपल्या रोकठोक बोलण्यामुळे चर्चेत येणारी परिणीती मद्यपानापासून दूर आहे.7 / 9सोनाक्षी सिन्हा - फिटनेस जपण्यासाठी सोनाक्षी मद्यपान वा धुम्रपान करत नाही.8 / 9सिद्धार्थ मल्होत्रा - ‘शेरशाह’ फेम सिद्धार्थ मद्यपान व धुम्रपान या व्यसनांपासून लांब आहे.9 / 9दीपिका पदुकोण - एका मुलाखतीमध्ये दीपिकाने तिच्या फिटनेसविषयी भाष्य केलं होतं. यात ती डाएट आणि ड्रिंक्स करण्यावर नियंत्रण ठेवते असं म्हणाली होती.