शरद केळकरने हिंदी अभिनेत्रीशी केलंय लग्न, अभिनेत्याच्या पत्नीने मालिकांमध्येही केलंय काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 15:55 IST
1 / 8शरद केळकर हा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने मराठी, हिंदी आणि साऊथमध्येही काम केलं आहे. 2 / 8शरदप्रमाणेच त्याची पत्नीही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. त्याच्या पत्नीचं नाव किर्ती असं आहे. 3 / 8किर्तीने अनेक हिंदी मालिकाविश्व गाजवलं आहे. 'सिंदूर तेरे नाम का', 'सात फेरे', 'ससुराल सिमर का', 'कुसुम','छोटी बहू' अशा गाजलेल्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 4 / 8किर्ती आणि शरदने ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. या मालिकेच्या सेटवरच त्यांच्यात जवळीक वाढली. 5 / 8त्यानंतर ३ जून २००५ साली त्यांनी लग्न केलं. त्यांना एक मुलगी असून तिचे नाव किशा आहे. 6 / 8मंगळवारी किर्तीचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसासाठी शरदने खास पोस्ट शेअर केली होती. 7 / 8किर्ती व शरद नेहमी एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. 8 / 8'नच बलिए' या रिअॅलिटी डान्स शोमध्येही त्यांनी सहभाग घेतला होता.