Join us

शाहरुख खानची मॅनेजर पूजाचा महिन्याचा पगार किती? करोडोंच्या संपत्तीची आहे मालकीण

By देवेंद्र जाधव | Updated: April 3, 2025 17:09 IST

1 / 7
यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, असं म्हटलं जातं. शाहरुख खानच्या यशामागे मात्र तीन स्त्रिया आहेत. एक त्याची आई, दुसरी त्याची पत्नी गौरी आणि तिसरी त्याची मॅनेजर पूजा ददलानी.
2 / 7
पूजा ददलानी २०१२ पासून शाहरुखची मॅनेजर म्हणून काम करतेय. तेव्हापासून शाहरुखचं वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात आलेल्या चढ-उताराची पूजा साक्षीदार आहे.
3 / 7
पूजा ददलानीने २००८ मध्ये बिझनेसमन हितेश गुरनानसोबत लग्न केलं. हितेश आणि पूजाला रैना ही मुलगी आहे
4 / 7
पूजा करोडोंच्या संपत्तीचं मालकीण असून मीडिया रिपोर्टनुसार ती वर्षाला ९ कोटी रुपये कमावते. याशिवाय पूजाचा महिन्याचा पगार ७५ लाख रुपये असल्याचं समजतंय.
5 / 7
२०२१ च्या एका रिपोर्टनुसार, पूजा ४० ते ५० कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे. पूजाचं स्वतःचं वांद्रे येथे घर असून शाहरुखची पत्नी गौरी खानने स्वतः तिच्या घराचं इंटेरिअर डिझाईन केलंय.
6 / 7
२०२१ ला शाहरुखचा लेक आर्यन खानला जेव्हा NCB ने अटक केली होती तेव्हा कोर्टकचेरी आणि इतर गोष्टी पूजाने मॅनेज केल्या होत्या. आर्यनचा जामीन जेव्हा फेटाळण्यात आला तेव्हा पूजाच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
7 / 7
गेली अनेक वर्ष शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग म्हणून पूजा काम करतेय. ती अनेकदा शाहरुखसोबत इव्हेंट, शूटिंग सेट आणि पुरस्कारांच्या सोहळ्यात दिसत असते.
टॅग्स :शाहरुख खानगौरी खानबॉलिवूडआर्यन खानसमीर वानखेडेसुहाना खान