Join us

Shahid Kapoor : "मी २५० ऑडिशन्स दिल्या, कपडे घ्यायला नव्हते पैसे; पण काही लोक BMWमध्येही स्ट्रगल करतात"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 16:50 IST

1 / 11
शाहिद कपूर आज बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. शाहिदचे वडील पंकज कपूर हे देखील इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणले जातात. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
2 / 11
शाहिदला इंडस्ट्रीत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. अनेक ऑडिशन्स द्याव्या लागल्या. त्याला प्रसिद्धी, लोकप्रियता आणि नाव हे सहजासहजी मिळालेलं नाही.
3 / 11
शाहिद फक्त ३ वर्षांचा असताना त्याचे आईवडील वेगळे झाले. शाहिदचं संगोपन त्याची आई नीलिमा अझीम यांनी केलं. लहानपणी खूप त्रास सहन करावा लागला. भाड्याच्या घरात राहावं लागलं.
4 / 11
आता अभिनेत्याने काही पर्सनल गोष्टी शेअर केल्या आहेत. त्याचा आयुष्यातील कठीण काळ आणि परिस्थिती याबाबत सांगितलं आहे.
5 / 11
राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या संघर्षांबद्दल बोलताना शाहिद म्हणाला - 'माझे वडील अभिनेते आहेत आणि माझी आई कथक डान्सर आहे. मी भाड्याच्या घरात राहिलो.'
6 / 11
'मी अनेक ऑडिशन्स दिल्या आहेत. मला कोणतेही विशेषाधिकार मिळाले नाहीत. आता फॅशन सेन्सचं खूप कौतुक केलं जातं पण तेव्हा परिस्थिती फार वेगळी होती.'
7 / 11
'माझ्या संपूर्ण आयुष्यात, माझ्या परिस्थितीमुळे मला मी व्हिक्टिम असल्यासारखं वाटलं आहे. पण काही लोक तर बीएमडब्ल्यूमध्येही स्ट्रगल करतात. मी २५० ऑडिशन्स देऊन आलो आहे. माझ्या परिस्थितीने मला साथ दिली नाही.'
8 / 11
'लोक म्हणतात की, शाहिदचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. पण मला अशा गोष्टींवर हसू येतं, कारण मला तो काळ आठवतो जेव्हा माझ्याकडे लोखंडवाला येथून कपडे खरेदी करण्यासाठीही पैसे नव्हते.'
9 / 11
शाहिद लवकरच 'देवा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात शाहिद एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
10 / 11
'देवा'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता चाहते चित्रपटाची वाट पाहत आहेत. 'देवा' हा चित्रपट ३१ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
11 / 11
टॅग्स :शाहिद कपूरबॉलिवूड